मळेवाड नदीपात्रात मगरीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळेवाड नदीपात्रात
मगरीचे दर्शन
मळेवाड नदीपात्रात मगरीचे दर्शन

मळेवाड नदीपात्रात मगरीचे दर्शन

sakal_logo
By

L30503

- मळेवाड ः नदीपात्रातील मगर (छाया ः धनश्री मराठे)

मळेवाड नदीपात्रात
मगरीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. २० ः येथील नदीपात्रात मगर दिसून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मळेवाड येथील पुलानजीक मगरीचे वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. मुरकरवाडी येथील ग्रामस्थ अतुल मुरकर, विश्वास चराटकर, विनय जाधव, स्वप्नाली जाधव यांना ही मगर दृष्टीस पडली. बराच वेळ ती नदीपात्रात होती. त्यानंतर ती पाण्यात पसार झाली. सध्या मगरी रोजच येथील शेतकरी, ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत असतात. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. येथील नदीपात्राच्या बाजूने बऱ्याच जणांची शेती आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. येथील जवळपास असलेल्या वाड्यांतील ग्रामस्थ या नदीपात्राच्या बाजूला शेती असल्यामुळे त्यांची या भागात येजा असते. याची दखल वन विभागाने तत्काळ घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69654 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top