टुडे पान दोन मेन-हिवताप विभागात 98 पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान दोन मेन-हिवताप विभागात 98 पदे रिक्त
टुडे पान दोन मेन-हिवताप विभागात 98 पदे रिक्त

टुडे पान दोन मेन-हिवताप विभागात 98 पदे रिक्त

sakal_logo
By

हिवताप विभागात ९८ पदे रिक्त
डॉ. रमेश कर्तस्कर ः साथरोग नियंत्रण कामकाजावर ताण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २० ः जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १८५ मंजूर पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून तब्बल ९८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे साथरोग नियंत्रण कामकाजावर ताण पडत आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली.

जिल्हा हिवताप विभागामार्फत मलेरिया, डेंगी, माकडताप यासारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागातील सर्व्हे, औषध फवारणी, रुग्णांचे रक्त नमुने गोळा करणे, रुग्ण शोधणे आदी कामांसाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र जिल्हा हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू झाल्याने साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. अशा वेळी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र हिवताप विभागात विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पड़त आहे.
जिल्हा हिवताप विभागाकडे अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३९, आरोग्य सहायक ४०, आरोग्य कर्मचारी (पुरुष) ९४ व क्षेत्र कर्मचारी ७ अशी एकूण १८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, आरोग्य सहायक २४, आरोग्य कर्मचारी ५४ व क्षेत्र कर्मचारी २ अशी एकूण ८७ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही हिवताप विभागाकडे प्रमुख अधिकाऱ्यांसह ९८ पदे रिक्त आहेत. यामध्ये अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३५, आरोग्य सहायक १६, आरोग्य कर्मचारी ४० व क्षेत्र कर्मचाऱ्यांची ५ पदे रिक्त आहेत.
जिल्हा हिवताप विभागाकडील प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण मंजूर पदांच्या ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा साथरोग नियंत्रण कामकाजावर परिणाम होत आहे. साथरोग सर्व्हेक्षण, औषध फवारणी, रुग्ण शोध मोहीम यासारखे उपक्रम राबविताना कार्यरत यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने हिवताप विभागाकडील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कर्तस्कर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69673 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top