
संक्षिप्त पट्टा
-rat20p5.jpg
30458
ःखेड ः किंजळे येथे ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करताना मिशन एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स मुंबईचे पदाधिकारी.
--------------------------
पाच शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट
खेड, ता. २३ ः मुंबई येथील मिशन एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्सच्यावतीने तालुक्यातील पाच शाळांतील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. किंजळेतर्फे खेड येथील श्रीमती रावजीशेठ जाधव हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला. वॉरियर्सच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी निश्चितच मदत मिळणार आहे, असे गौरवोद्गार या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल झोरे यांनी काढले. या वेळी सीबीआय अधिकारी सागर बोरणारे, बीएमसी अधिकारी हरिबा सोनवणे, ज्ञानदीप हायस्कूलच्या संचालिका रागिनी झोरे, मुख्याध्यापक जाधव, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे, धोंडू गोरे, राहुल ढेबे, कैलास शिर्के आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दर्शना मोरे होत्या. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असतेच त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी समाजाच्या भक्कम पाठबळाची गरज आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील हातभार लावणे तितकेच गरजेचे आहे. हा स्तुत्य उपक्रम आदर्शवत असल्याचे दर्शना मोरे यांनी सांगितले.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69675 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..