चिपळूण ः टेरवमध्ये साकारणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः टेरवमध्ये साकारणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
चिपळूण ः टेरवमध्ये साकारणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक

चिपळूण ः टेरवमध्ये साकारणार शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक

sakal_logo
By

-rat20p30.jpg
30580
टेरव येथील वाघजाई भवानीमातेच्या मंदिर परिसरात छत्रपतींचे स्मारक होणार आहे.
----------------------
टेरवमध्ये शिवछत्रपतींचे भव्य स्मारक

राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी; बांधकाम आराखड्यासाठी समिती स्थापन, चाकरमान्यांचे सहकार्य
नागेश पाटीलः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः तालुक्यात ब पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या टेरव येथे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. यासाठीचा शासन निर्णय सोमवारी (ता. २०) जाहीर करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधकामाचा आराखडा व बांधकामावर सनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे टेरव येथे शिवाजी महाराजांचे तालुक्यातील पहिले स्मारक साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टेरव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होण्यासाठी माजी उपसरपंच किशोर कदम यांचे आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्यामार्फत प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. टेरव येथे शिवाजी महाराजांचे स्मारक होण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील मंजुरी दिली आहे. स्मारकाच्या बांधकामाचा आराखडा आणि नियंत्रण ठेवण्यासाठी समितीदेखील गठित केली आहे. ही समिती स्मारकाच्या बांधकामखर्चाचा तपशील शासनाला देणार आहे.
या स्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह टेरवमधील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमान्यांचे सहकार्य मिळाले. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, निवासी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वस्तूसंग्रहालय अंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी, नगररचनाकार, कला संचनालयअंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी चिपळूण, तहसीलदार यांच्यासह टेरव येथील मानसी कदम, अशोक साळवी, सुदेश साळवी, एकनाथ माळी, सुधाकर कदम, किशोर कदम, पार्थ कदम हे १८ जण सदस्य आहेत तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
..
चौकट
वाघजाई व भवानी माता श्रद्धास्थान
टेरव येथे ब पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेले वाघजाई भवानीमातेचे मंदिर आहे. श्री देवी वाघजाई व भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे याच मंदिर परिसरात शिवाजी महाराजांचे स्मारक झाल्यास त्याला चांगली झळाळी मिळणार आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक झालेले नाही.
..
चौकट
स्मारकाच्या ठिकाणी हे उभारणार ..
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
वाचनालय, सभागृह, बगीचा, वस्तूसंग्रहालय

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69749 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top