दूषित पाणीप्रश्नावर वैभववाडीवासिय एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूषित पाणीप्रश्नावर वैभववाडीवासिय एकवटले
दूषित पाणीप्रश्नावर वैभववाडीवासिय एकवटले

दूषित पाणीप्रश्नावर वैभववाडीवासिय एकवटले

sakal_logo
By

swt2026.jpg
30591
वैभववाडीः शहरातील विविध प्रश्नांबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत गुलाबराव चव्हाण, सज्जन रावराणे, मीना बोडके, सचिन तावडे, मनोज सावंत आदी होते.

दूषित पाणीप्रश्नावर नागरिक एकवटले
वैभववाडीत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत सांडपाणी, जनआंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २०ः शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये सांडपाणी जात असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून शहरातील सर्वपक्षीय आज एकवटले. तोंडी, लेखी सूचना देऊनही नगरपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे नागरिकांनी जनआंदोलन छेडण्याची भूमिका आजच्या बैठकीत निश्चित केली.
शहरातील नागरिकांना भासणाऱ्या विविध समस्या नगरपंचायत प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतरही ढिम्म प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे शहरातील विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागत नाहीत. याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज सायकांळी बलुतेदारी विकास सोसायटीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला बँकेचे माजी संचालक गुलाबराव चव्हाण, माजी नगरसेवक सज्जन रावराणे, मीना बोडके, गणेश मसुरकर, नगरसेवक अक्षता जैतापकर, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, सचिन तावडे, सुनील रावराणे, सुरेंद्र रावराणे, शिवाजी राणे, यशवंत प्रभुलकर, मारुती मोहिते, श्री. कुबडे आदी उपस्थित होते.
वैभववाडी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असलेल्या विहिरीमध्ये शहरातील दुषित सांडपाणी जाते. त्याच पाण्याचा पुरवठा शहराला होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांनी दूषित पाणी शांती आणि शुकनदीला सोडले आहे. गेले काही दिवस तर नागरिकांना गढुळ पाणी येत आहे. या सर्व गोष्टी नगरपंचायत प्रशासनाच्या निर्दशनास आणूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तोंडी, लेखी पत्रव्यवहार देखील करण्यात आला. उपोषणाची नोटीस देखील देण्यात आली; परंतु कोणत्याही उपाययोजना नगरपंचायतीने केलेल्या नाहीत. निव्वळ आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले जात नसल्याचा मुद्दा श्री. चव्हाण यांनी बैठकीत मांडला. त्यानंतर श्री.रावराणे, श्रीमती बोडके, श्री. मसुरकर, श्री. तावडे यांनी देखील भूमिका मांडली. शहरातील पाण्यासह रस्ते, विहिरी, गटारे, स्ट्रीटलाईट आदी प्रश्नावर राजकीय पादत्राणे बाजुला ठेवून आपण शहरवासीय म्हणून एकत्र आले पाहिजे. तरच शहरातील विकास योग्य मार्गाने होईल; अन्यथा आतापर्यंत जसे सुरू आहे, तसेच सुरू राहील. नगरपंचायतीला आतापर्यंत काम करण्यासाठी मुभा दिलेली आहे; परंतु यापुढे अन्य पर्यायाचा वापर केला पाहीजे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची माहिती देणे आवश्यक आहे. तरीही प्रश्न मार्गी न लागल्यास जनआंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा शहराच्या विकासाचा लढा असणार आहे. त्यामुळे कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

चौकट
सर्व पक्षीयांची उपस्थिती
भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे असे सर्व पक्षाचे पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते. पक्षीय राजकारणापेक्षा शहराचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे, हे पटल्यामुळे आम्ही एकत्र आल्याचे सर्वांनी सांगितले.

चौकट
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
नगरपंचायत प्रशासनाच्या सर्व बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आम्ही या गोष्टी मांडणार आहोत. त्यानंतर सुध्दा प्रश्न सुटले नाहीत, तर मात्र जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा उपस्थितांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69761 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top