
पा ३ मस्ट
मुलीला पळवून नेणारा मुलीसह ताब्यात
दापोली पोलिसांनी मुलीला दिले नातेवाईकांच्या ताब्यात
दाभोळ : दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयितास दापोली पोलिसांच्या पथकाने मानखुर्द (मुंबई) येथून या मुलीसह ताब्यात घेतले असून, दापोली येथे आणल्यावर या मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दापोली तालुक्यातील १६ वर्षे ८ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला १७ जून रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे दिला होता.
उपनिरीक्षक पाटील यांनी तातडीने याचा तपास करून या मुलीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केल्यावर ही मुलगी मानखुर्द येथे असल्याचे स्पष्ट झाले, उपनिरीक्षक शीतल पाटील यांचे नेतृत्वाखाली कॉनस्टेबल सातार्डेकर, चव्हाण, झावरे यांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन या मुलीस व तिचे अपहरण करणारा संशयित साबीर अली (वय २७) याला ताब्यात घेतले, या दोघांनाही दापोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून संशयित साबीर अली याला अटक केली आहे. साबीर अली हा मूळचा उत्तर प्रदेश येथील असून तो ही मुलगी राहत असलेल्या गावी यापूर्वी राहत होता, त्यातच या मुलीशी त्याची ओळख झाली व त्यातूनच त्याने या मुलीला फूस लावून पळवून नेले होते.
............
चौकट
उपनिरीक्षक शीतल पाटील यांची कामगिरी
उपनिरीक्षक शीतल पाटील या दापोली पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून त्यांच्याकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची जेवढी प्रकरणे तपासासाठी देण्यात आली होती. त्या सर्व प्रकरणांचा त्यांनी यशस्वी तपास करून सर्व मुलींचा शोध लावला आहे, याबद्दल त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी मेडल देऊन त्यांचा गौरव केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69801 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..