
दालभेश्वर रस्त्यावरील खड्डे बुजवले
दालभेश्वर रस्त्यावरील खड्डे बुजवले
दाभोळ ः दाभोळ गावातील दालभेश्वर पाखाडी, बेंडलवाडी, नारायणवाडीमधून जाणारा रस्ता खड्डेमय झाला होता. हे खड्डे बुजवण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शिवसेनेचे बुरोंडी विभाग समन्वयक सुधीर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ बुरोंडी उपविभागप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पारदले, मनोज भुवड, महेंद्र राणे, सिद्धेश आग्रे व वाडीतील सर्व ग्रामस्थांनी श्रमदान करत सामाजिक बांधिलकी जपत या रस्त्यावरचे खड्डे बुजवले.
-------------
बुरोंडकर हायस्कूलचे यश
दाभोळ ः कोकणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोली संचालित अ मजीद अ बुरोंडकर हायस्कूल दापोलीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. रूशदा मुकादम हिने ९६.८० टक्के मिळवून प्रशालेत प्रथम, सानिया साहिबोले हिने ९३.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर झिशान इसाक खान ९३.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. पूज्य साने गुरुजी विद्यालय पालगड या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून श्रुती मर्चंडे, श्रुती कांबळे, सोनाली कोशिमकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. यु. ए. दळवी हायस्कूलचा निकालही १०० टक्के लागला. आलिया देशमुख, अयान बांगी, असिया ऐनरकर यांनी क्रमांक मिळवले. लोकमान्य हायस्कूलने यशाची परंपरा कायम राखली असून या शाळेचा सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला. अथर्व बाक्कर, दीक्षा बैकर, सानिया शिर्के यांनी क्रमांक मिळवले.
--------------
स्वयंरोजगारासाठी आग्रेंचे मार्गदर्शन
दाभोळ ः मुंबई येथील सुपूर्वा ट्रेडलिंक कंपनी या संस्थेकडून दापोली तालुक्यातील भोपण विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ येथे दिव्यांग (अपंग), गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तीसाठी सुरवातीला ही संस्था मदतीचे हात पुढे करत आहे. या वेळी या विभागातील १७ दिव्यांग व्यक्ती यांना याचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
- ratchl२०६.jpg
L30525
ः चिपळूण ः सावर्डे येथे वृक्षारोपण करताना जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत राधा गोविंद फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा निकम.
----------------
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील राधा गोविंद फाउंडेशन यांच्यामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा सावर्डे, कासारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या फाउंडेशनने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शाळेच्या वृंदावनात फळझाडे (रामफळ), औषधी झाडे (कोरफड), शोभिवंत फुलझाडांचे वृक्षारोपण शालेय विद्यार्थी, माजी सभापती पूजा निकम व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत केले. या वेळी पूजा निकम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाबरोबर वृक्षसंवर्धन व संगोपनाचे महत्त्व सांगून वृक्षांप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला ५ झाडांची लागवड करून त्याचे योग्यप्रकारे जतन व संवर्धन करण्यास सांगितले. या वेळी सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सरपंच बाळूशेठ मोहिरे, मधूकर सुर्वे, मुख्याध्यापिका मधुरा सोहनी, दत्ताराम उदेग, शरद चव्हाण, संदीप थेराडे, सीमा गुढेकर, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69818 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..