मंडणगड ः शालेय पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः शालेय पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको
मंडणगड ः शालेय पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको

मंडणगड ः शालेय पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको

sakal_logo
By

30640
तिडे ः शुभेच्छा म्हणून मिळालेली वह्यापुस्तके तिडे आदिवासीवाडी शाळेत वाटप करताना गटविकास अधिकारी सुवर्णा बागल.
---------------
शालेय पुस्तके द्या; पुष्पगुच्छ नको

मंडणगड बीडीओंचा संदेश; शुभेच्छा म्हणून पुस्तकांचा स्वीकार
मंडणगड, ता. २० ः स्वागताला येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणून पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा शालेय पुस्तक द्या, तालुक्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना ती पुस्तके देण्यात येतील, असा संदेश नवनियुक्त गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांनी दिला. त्यांनी पंचायत समितीचा कार्यभार नुकताच स्वीकारला.
गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यात रुजू होताना अधिकारी या नात्याने समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची चुणूक दाखवताना दिलेला संदेश तालुकावासीयांसाठी औत्सुक्याचा विषय बनला. विकासाची व्याख्या इतक्या साध्या पातळीवर मांडून समाजाची सेवा करण्याची संधी न सोडण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न सगळ्यांचाच कौतुकाचा विषय बनला आहे. मंडणगड पंचायत समितीच्या स्थापनेपासून हजारो अधिकारी, कर्मचारी व डझनावारी गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यात सेवा बजावली. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला; मात्र इतक्या सूक्ष्म पातळीवर जाऊन विचार करणारा, समाजाच्या, तालुकावासीयांच्या प्रश्नांची चाड असणारा कार्यतत्पर अधिकारी तालुक्यास पहिल्यांदाच लाभल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69830 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top