
राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक जाहीर
राज्य सरकारी कर्मचारी
पतसंस्था निवडणूक जाहीर
कणकवली, ता. २१ ः सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी २४ जुलै रोजी होणार असून त्यासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ जून रोजी दुपारी तीनपर्यंत आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख २७ जून ते १९ जुलै रोजी दुपारी तीनपर्यंत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नेहमी अटीतटीची होणार आहे; मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला ७ वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. असे असले तरी पाच वर्षांपुर्वी आजी-माजी संचालक मंडळाने बिनविरोध निवडणुकीची संकल्पना राबवून अडीच वर्षांनी पहिल्या संचालकांनी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या फळीतील उमेदवारांना संचालकपद अडीच वर्षांनी रिक्त करून द्यावयाचे होते; परंतु निवडणूक नियमांचा आधार घेत एकाही संचालकाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे अनेक उमेदवार नाराज आहेत. म्हणूनच यावर्षी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बहुसंख्य विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी २३ जून पर्यंत विविध खात्यातील काही इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या तारखेपुर्वी बिनविरोध संकल्पना राबविण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची बैठक घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा काही तालुका व जिल्हा प्रवर्गातील जागांसाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे असे समजते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69918 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..