चिपळूण - अखेर पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - अखेर पावसाची हजेरी
चिपळूण - अखेर पावसाची हजेरी

चिपळूण - अखेर पावसाची हजेरी

sakal_logo
By

रिमझिम पावसाने बळीराजाला दिलासा
भातशेती तरेल ; दोन दिवस जोर घरला
चिपळूण, ता. २१ ः दडी मारलेल्या पावसाने सोमवारपासून तालुक्यात रिमझिम बरसण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना हवेतील वातावरण व पावसाचे पाणी पोषक ठरणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
या वर्षी पावसाने जून महिन्याच्या सुरवातीला भातपेरणी केली होती; मात्र पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले भातबियाणे वाया जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत होती. त्यात सोमवारपासून रिमझिम पावसाने सुरवात केली. त्यामुळे हवेतील वातावरण व पावसाचे पाणी हे भातशेतीला पोषक ठरणार आहे. एकंदरित पेरणी केलेल्या भातरोपांची जलदगतीने वाढ होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
पावसाने सोमवारी या दिवसात रिमझिम का होईना सुरवात केल्याने शेतकरी, विद्यार्थी व पालकांनी बाजारात जाऊन छत्री, प्लास्टिक ताडपत्री, खते, कीडनाशके खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
चिपळूण तालुक्यासह खेड, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यातील शेतकरी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून होते. सोमवारी पावसाला सुरवात झाली. मंगळवारीही त्याचा जोर कायम होता.
महावितरणकडून काही भागात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे सोमवारी कामाच्या दिवशी खंडित विजेचा फटका अनेक व्यावसायिकांना बसला. वातावरणातील बदलामुळे अनेक भागात दवाखान्यात सर्दी, ताप खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा धोका आहे. आरोग्य विभागाकडून त्यासाठी दक्षता घेण्याची सूचना केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69962 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top