
आमदार निधीतून सहकार्य करण्याची ‘ज्ञानदीप’ची मागणी
30721
सावंतवाडी ः बाळाराम पाटील यांना निवेदन देताना वाय. पी. नाईक आदी.
आमदार निधीतून सहकार्य
करण्याची ‘ज्ञानदीप’ची मागणी
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचे सावंतवाडी शहरात गेली अनेक दशके शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांच्याकडे ज्ञानदीप मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी आमदार निधीतून आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक वाय. पी. नाईक यांनी मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी लवकरच ‘ज्ञानदीप’ला योग्य ते सहकार्य करू, अशी ग्वाही देत विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डान्टस, महिला आघाडीच्या नेत्या अर्चना घारे-परब, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, ज्ञानदीपचे अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष नीलेश पारकर, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69979 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..