
कणकवली : कॉलेज कार्यक्रम
L३०७७०
कणकवली : येथील कणकवली कॉलेजमध्ये केशवराव राणे यांना अभिवादन करण्यात आले.
--------------------
आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करून उन्नती साधा
डॉ.विलास सावंत : कणकवली कॉलेजमध्ये केशवराव राणे यांना अभिवादन
कणकवली, ता.२१ : कोरोना महामारीत सर्व उद्योग बंद पडले. तर शेती व्यवसाय मात्र तेजीत होता. शेती व्यवसायातून समृद्धता आणावयाची असेल तर आधुनिक तंत्रज्ञान वापरायला हवे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र किर्लोस येथील कृषी तज्ज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले.
कणकवली काॅलेजचे संस्थापक चेअरमन केशवराव राणे यांना आज कणकवली कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ.विलास सावंत यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन पी. डी. कामत, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे, सदस्य आप्पासाहेब सापळे, डॉ.सविता तायशेटे, डॉ. संदीप साळुंखे, प्रगतशील शेतकरी मुरलीधर राणे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम माजी आमदार केशवराव राणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी "कनक" या वार्षिक अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली कॉलेजची उभारणी करणारे केशवराव राणे यांचे रांगोळीतून छायाचित्र कॉलेजचा विद्यार्थी मितेश पाताडे याने काढले होते. ही रांगोळी लक्षवेधी ठरली.
दरम्यान कार्यक्रमात भाई खोत, डॉ.राजश्री साळुंखे, पी.डी.कामत यांनी केशवराव राणे यांच्या कार्याबाबत विचार मांडले. प्राचार्य डॉ. राजेन्द्रकुमार चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी व आभार डॉ. बी एल. राठोड यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70026 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..