
समुद्रकिनाऱ्यावर विसावल्या मासेमारी होड्या
rat21p12.jpg
30680
तुळसुंदेः किनाऱ्यावर होडी आणताना मच्छीमार बांधव.
rat21p13.jpg ः
30681
किनाऱ्यावर विश्रांती घेत असलेल्या होड्या.
समुद्रकिनाऱ्यावर विसावल्या मच्छीमारी होड्या
शासनाकडून बंदी काळ लागू; डागडुजी, रंगकामाला आरंभ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ः पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांना धोका निर्माण होण्याची शक्यता आणि पावसाळ्यात प्रजननकाळात माशांना धोका पोहोचू नये म्हणून शासनाकडून मच्छीमारी व्यवसायाला पावसाळ्यामध्ये बंदी लागू केली आहे. त्यामुळे सहा महिन्यापेक्षा अधिक काळ समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मच्छीमारी नौका आणि होड्यांना पावसाळ्याच्या तोंडावर विश्रांती मिळून समुद्रकिनाऱ्यावर विसावल्या आहेत. किनाऱ्यावर विसावलेल्या होड्यांची डागडुजी करण्यासह रंगकाम करण्यामध्ये मच्छीमार बांधव गुंतले आहेत.
तालुक्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर दिपावली ते मे महिनाअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय चालतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या तालुक्यातील नाटे, साखरीनाटे, सागवे, आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे आदी गावांतील सुमारे २५० ते ३०० मच्छीमार या हंगामामध्ये मच्छीमारी करत असतात. या काळात केल्या जाणाऱ्या मच्छीमारीवरच तालुक्याच्या या पश्चिम किनारपट्टीतील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातून, या परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल दरवर्षी या हंगामामध्ये होते.
किनाऱ्यावर असलेल्या या होड्या आणि नौकांची डागडुजी आणि किरकोळ दुरुस्ती, रंगकाम करणे आदी कामे करण्यामध्ये मच्छीमार बांधव सध्या गुंतलेला असल्याचे चित्र किनाऱ्यावर दिसत आहे. मच्छी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळेही सुकवण्याचे आणि फाटलेल्या जाळ्याची दुरुस्ती करण्याच्या कामाची लगबग मच्छीमारांची सध्या सुरू आहे.
चौकट
खोल समुद्रात जाण्याला बंदी
जून हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात माशांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून मच्छी संवर्धनाच्या उद्देशाने शासनाकडून जूनपासून मच्छीमारी करण्याला बंदी लागू केली जाते. पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारी करताना मच्छीमारांना धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मच्छीमारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्या काळात मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारासाठी जाण्याला शासनाकडून बंदी लागू केलेली असते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70103 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..