दुचाकी मोटारी अपघातामध्ये प्रौढाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी मोटारी अपघातामध्ये प्रौढाचा मृत्यू
दुचाकी मोटारी अपघातामध्ये प्रौढाचा मृत्यू

दुचाकी मोटारी अपघातामध्ये प्रौढाचा मृत्यू

sakal_logo
By

दुचाकी मोटारीवर धडकून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी, ता. २१ः भातगाव ते जाकादेवी जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती मोटारीला धडकली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. मारुती चंद्रकांत जांभुळकर (वय ४५, रा. खानापूर-बेळगाव, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. संशयित स्वाराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय भावूक सावंत (वय २५, रा. सध्या कोसुंब-देवरुख, मुळ ः बेळगाव, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विल्ये गावी भातगाव ते जाकादेवी जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
--------
मद्याच्या नशेत
प्रौढाची आत्महत्या
साखरपा, ता. २१ः संगमेश्वर तालुक्यात दाभोळे येथे एका प्रौढाने दारूच्या नशेत पत्नीला घराबाहेर काढून स्वत: आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (ता. १९) रात्री उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत उदय सदाशिव हिरवे (वय ५५, रा. बाजारपेठ-दाभोळे) यांना दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत वारंवार वाद होत असत. रविवारी रात्री उदय दारू पिऊन घरी आला आणि त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. त्या भांडणात त्यांने पत्नीला घराबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि घरात लाकडी वाशाला पत्नीच्या साडीच्या साह्याने घळफास लावून घेत आत्महत्या केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70108 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top