
पान एक-डंपरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू
30894
दाभोली ः हळदणकरवाडी येथे अपघातानंतर पंचनामा करताना पोलिस.
डंपरखाली चिरडून
शेतकऱ्याचा मृत्यू
चाऱ्यासाठी गेल्यावर दाभोलीत दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २१ ः चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा डंपरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्य झाला. बाबूराव ऊर्फ बाबलो गंगाराम मयेकर (वय ६३) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या घरापासून सुमारे ७०० मीटरवर दाभोली-हळदणकरवाडी येथे खडी घेऊन जाणाऱ्या डंपरने धडक दिली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. डंपरचालक विनायक यशवंत राऊळ (रा. तेंडोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानोली-घोगळवाडी येथे राहणारे मयेकर दाभोली-हळदणकरवाडी येथे गुरांसाठी चारा आणण्यास गेले होते. ते मुख्य रस्त्यावर आलेले असताना खानोली दिशेने दाभोली दिशेला खडी घेऊन जाणारा डंपर (केए- ७० - ३०८७) भरधाव वेगाने आला. डंपरच्या स्टेपनीची धडक मयेकर यांना बसली. त्यामुळे ते डंपरच्या पाठीमागील डाव्या चाकाच्या खाली सापडले आणि त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
पोलिस निरीक्षक अतुल जाधव, हेड काँन्स्टेबल दत्ताराम पालकर यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दाभोली सरपंच उदय गोवेकर, पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर, खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, तलाठी मिलन चव्हाण आदीही घटनास्थळी आले. मयेकर यांचा मुलगा गंगाराम बाबूराब मयेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुडाळ-तेंडोली येथील डंपरचालक विनायक यशवंत राऊळ याच्याविरोधात वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम जाधव तपास करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70178 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..