
मुणगेत घर जमीनदोस्त
30888
मुणगे ः सुरेश लब्दे यांचे जमीनदोस्त झालेले घर. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर, मुणगे)
मुणगेत घर जमीनदोस्त;
सात लाखाचे नुकसान
मुणगे, ता. २१ ः मुणगे-लब्देवाडी येथील संरक्षक भिंत घरारावर कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात घरासह आतील सामानाचे सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली.
मुणगे परिसरात काल सायंकाळपासून पाऊस सुरू होता. आज पहाटेच्या दरम्यान पडत असलेल्या पावसामुळे लब्देवाडी येथील सुरेश सहदेव लब्दे यांच्या घरावर (क्रमांक १३७) नजीकची संरक्षक भिंत कोसळली. यात कौलारू घर जमीनदोस्त झाले. या घरामध्ये नेहमी झोपणारे मंगेश लब्दे यांचे भावोजी त्यादिवशी नेमके आपल्या घरी गेले असल्यामुळे अनर्थ टळला, या घरामध्ये मंगेश लब्दे यांचे भाऊ मयुर लब्दे हे आपला वेल्डिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या सर्व मशनरी यात ग्राईंडर ३, ड्रिलमशीन ३, टी.व्ही., संगणक, वुडकटर, वेल्डिंग मशिन २, काँम्प्रेसर, ब्रेकर, वायर, पावरस्प्रे आदी सामान मातीखाली गाडले. यात घरासह सुमारे सात लाखाचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे. येथील तलाठी सौ. वीणा मेहेंदळे, पोलिस पाटील सौ. साक्षी सावंत, सरपंच सौ. साक्षी गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोतवाल संजय रुपे, चंद्रशेखर तेली, अनिल धुवाळी, मंगेश लब्दे, मयुर लब्दे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70212 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..