
विजेचा धक्का बसून वायरमनाचा मृत्यू
विजेचा धक्क्याने
वायरमनाचा मृत्यू
देवगड, ता. २१ ः तालुक्यातील तांबळडेग येथील एका तरूण बाह्य स्त्रोत वायरमनाचा मृत्यू झाला. राकेश रमेश मोंडकर (वय ३५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२०) सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील इळये परिसरात घडली. विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी व्यक्त केला.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मोंडकर बाह्य स्त्रोत वायरमन म्हणून कार्यरत होते. इळये परिसरात काम सुरू होते. दरम्यान परिसरातील एका विद्युत खांबाजवळ ते पडलेले आढळले. त्यांना विजेचा धक्का बसला असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू कशाने झाला हे समजू शकेल असे पोलीस निरीक्षक श्री. बगळे यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगांवकर करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70213 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..