काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा - सुनील पांचाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा - सुनील पांचाळ
काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा - सुनील पांचाळ

काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा - सुनील पांचाळ

sakal_logo
By

rat22p2.jpg
30955
सुनील पांचाळ-धोपीस्कर
rat22p1.jpg
30954
सुनिल पांचाळ-धोपीस्कर यांनी लाकडात साकारले शिवाजी महाराज, साईबाबा आणि गौरी (गवर) काष्ठशिल्प.
--------
काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा
सुनील पांचाळ यांनी जोपासला छंद; छत्रपती शिवराय, साईबाबांच्या शिल्पाला दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ः कोरोनाच्या कालावधी सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला. कलाक्षेत्रात असलेल्या सर्वांनीच विविध कला जोपासल्या. अगदी असेच साखरपा - मुरलीधरवाडी येथील सुनील गोपाळ पांचाळ - धोपीस्कर यांनी लहानपणी गौरीचे मुखवटे करत होते. कोरोना काळात साग आणि शिवणीच्या लाकडातून छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबांचे काष्ठशिल्प तयार करून कोकणपट्यात त्यांनी नावलौकीक मिळविला.
सुनील पांचाळ यांना पिढ्यांनपिढ्या सुरू असलेल्या फर्निचर, घरबांणीच्या कामाचा अनुभव होता. फर्निचर तयार करण्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. साखरपा येथे असताना लहानपणी त्यांनी गणपतीसाठी गौरी (गवर) बनवली होती. त्यांच्या त्या काष्ठशिल्पाला जाणकारांनीही नावजले होते. पुढे कुटुंबाचा आर्थिक भार संभाळण्यासाठी फर्निचरचा व्यवसायासाठी मुंबई येथे गेले. तेथे दहा वर्षे पॅटन मेकर्सच्या व्यवसायात होते. पॅटन मेकर्सची चांगली माहिती त्यांना श्री. काणेकर यांच्याकडून मिळाली. या माहितीमुळे काष्ठशिल्प तयार करण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला होता. कालांतराने पॅटन मेकर्सचे काम बंद झाले. पुढे काय करावे असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. पुन्हा त्यांनी फर्निचरचा व्यवसाय वृद्धींगत केला होता. त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांनी घराच रस्ता धरला पुन्हा गावाकडे साखरपा येथे आले.
गावाला आल्यावर मिळालेला वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी छंदातून लाकडात छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबांचे काष्ठशिल्प हुबेहूब तयार केले. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कराड येथून त्यांच्या कलेला दाद मिळाली. काष्ठशिल्पांचे दूरध्वनीवरून कौतूक केले. काष्ठशिल्पाचे कामही मिळाले. त्यांच्या या कलेमुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत मिळाली असल्याचे श्री. पांचाळ यांनी सांगितले.
------
चौकट
लाकडातून चेहऱ्याचे भाव उमटावे लागतात
फर्निचर व पॅटन मेकर्सच्या अनुभवातून काष्ठशिल्प तयार करण्यास मदत मिळाली आणि बालपणीच्या छंदाला चांगले वळण मिळाले. हे काम सोपे वाटत असेल तर तसे नाही. त्यासाठी अनुभव आणि चित्रानुसार लाकडात त्याचे भाव उतरावे लागतात, असे सुनील पांचाळ यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70340 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top