राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

sakal_logo
By

rat२२p१२.jpg
३१०२४
राजापूर नगरपालिका
--------------
राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध ; हरकतींसाठी २७ पर्यंत मुदत
राजापूर, ता. २२ : कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना निश्‍चित झाली आहे. असताना प्रशासनाकडू प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ८ हजार १०५ मतदारांचा समावेश आहे. या मतदार यांद्यावर २७ जूनपर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत.
नगरपालिकेची मुदत संपली असून कोरोना महामारीमुळे या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा ज्वर कमी झालेला असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. प्रभाग रचना निश्‍चित झाली असून प्रभागनिहाय आरक्षण सोडतही झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूका होण्याचे संकेत मिळत असताना आता प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
या प्रारूप मतदार यादीवर २७ पर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत. हरकतींवर प्रशासकीय सुनावणी होवून त्या निकालात काढून मतदारयादीला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर होताच ती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांची पावले नगरपालिकेकडे वळली आहेत.
-----------------
चौकट
मतदारसंख्येमध्ये वाढ
पाच वर्षापूर्वी राजापूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ७ हजार ५११ मतदारसंख्या होती. त्यामध्ये ३ हजार ६९१ पुरुष, तर ३ हजार ८२० एवढी महिला मतदारांची संख्या होती. पाच वर्षानंतर या मतदारसंख्येमध्ये ५९४ मतदारांची वाढ झाली आहे.
---------------
चौकट
काय आहे आरक्षण
येथील पालिकेची आगामी निवडणूक दहा प्रभागातील वीस जागांसाठी होणार आहे. त्याची आरक्षण सोडत झाली असून त्यामध्ये वीसपैकी दहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने त्या ठिकाणी पुरुष वा महिला यापैकी कोणालाही निवडणूक लढविता येणार आहे. वीसपैकी केवळ एक जागा अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित आहे. उर्वरित एकोणीस जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70341 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top