
पंचम खेमराज महाविद्यालयात ''नॅनो टेक्नॉलॉजी'' चर्चासत्र
पंचम खेमराज महाविद्यालयात
‘नॅनो टेक्नॉलॉजी’ चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे ''नॅनो टेक्नॉलॉजी'' या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात १२० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
व्यासपीठावर रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी. एम. शिरोडकर, पी. जी. समन्वयक प्रा. डी. डी. गोडकर, डॉ. संतोष हरम (पुणे विद्यापीठ) आदी उपस्थित होते. ''थिंक बिग विथ स्मॉल थिंग्ज ः नॅनो टेक्नोलॉजीचे ऊर्जा क्षेत्रातील योगदान'' या विषयावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. हरम यांनी मार्गदर्शन केले. नॅनो टेक्नॉलॉजीचे विविध प्रकार, त्याची सामाजिक उपयोगिता तसेच विविध औषध निर्मितीमध्ये व ऊर्जास्रोत निर्मितीसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो, हे त्यांनी विषद केले. नॅनो टेक्नॉलॉजी वापरून सौरऊर्जा कशी उपयोगात आणली जाऊ शकते, याचेही प्रात्यक्षिक व चलचित्राद्वारे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ठाकुर, प्रा. गोडकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिरोडकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. यू. सी. पाटील यांनी करून दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पाटील यांनी, आभार प्रा. यादव यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70344 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..