
उत्कर्ष मंडळातर्फे विलवडेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
31074
विलवडे ः उत्कर्ष मंडळातर्फे येथील नं. २ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
उत्कर्ष मंडळातर्फे विलवडेत
शैक्षणिक साहित्याचे वाटप
बांदा, ता. २२ ः उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा विलवडे नं. २ (टेंबवाडी) प्रशालेतील पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी व अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वा्टप करण्यात आले. स्कूलबॅग, वह्या, कंपास पेटी, पेन, चित्रकला वही इत्यादी साहित्याचे वाटप केले.
विलवडेतील मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्यातर्फे आईच्या स्मरणार्थ शाळेला संगणक संच भेट दिला. शाळेत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी विलवडे आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मणेरीकर, माजी उपसभापती कृष्णा सावंत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे रमण सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, प्रकाश दळवी, महेंद्र सावंत, सुभाष कानसे, संजय सावंत, सचिन सावंत, पूर्वा दळवी, धनश्री सावंत, माधुरी सावंत, समीता सावंत, मानसी सावंत, जान्हवी सावंत, वैष्णवी परब, अंगणवाडी सेविका सीमा दळवी, मनाली दळवी उपस्थित होते. सुरेश काळे यांनी प्रास्ताविक केले. सचिन शेळके यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70398 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..