
सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे मालवणात योग दिन
31075
मालवण ः योग प्रात्यक्षिके करताना सिंधुदुर्ग महाविद्यालय व ५८ महाराष्ट्र बटालियन.
मालवणात योग दिन
मालवण ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी व एनएसएस विभाग आणि ५८ महाराष्ट्र बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन येथील बंदर जेटी येथे साजरा झाला. एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी स्वागत केले. योग प्रशिक्षिका प्रतीक्षा गावडे (सावंतवाडी कॉलेज) यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने केली. अखिल भारतीय आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या मालवण शाखेचे डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी मार्गदर्शन केले. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर दीपक दयाल, एडम अफसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंदर सिंग, सुभेदार तुकाराम, सुभेदार इंद्रकेस, नायब सुभेदार जितेंद्र कुमार, हवालदार शिवशंकर, हवालदार महेश पवार, हवालदार रामकरण, हवालदार प्रकाशकुमार यांसह प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, माजी प्रा. आर. एन. काटकर, एनएसएस ऑफिसर प्रा. शंकर खोबरे, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एच. एम. चौगले, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. कैलास राबते, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. हसन खान, प्रा. अन्वेषा कदम आदी सहभागी झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70399 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..