
देवगडला पावसाने झोडपले
31157
जामसंडे ः मुसळधार पावसामुळे येथे रस्त्यावर साचलेले पाणी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगडला पावसाने झोडपले
४५१ मि.मीची नोंद; तालुक्यात शेतीच्या कामांना वेग
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः तालुक्याच्या किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे ११६ मिलीमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात आजपर्यंत ४५१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. आज सकाळीही येथे जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.
मंगळवारी (ता. २१) दिवसभर आणि रात्रीही येथे जोराचा पाऊस झाला. किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपले. जोराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काही भागात रस्त्यापर्यंत पाणी आले होते. त्यामुळे पाण्यातूनच वाहने हाकावी लागत होती. आज सकाळीही जोराचा पाऊस झाला. त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोय सोसावी लागली. आज रात्रीही पाऊस कोसळण्याची लक्षणे दिसत होती. जोराच्या पावसाने शेतीच्या कामांना वेग आला आहे. जमीन नांगरणीची कामे सुरू आहेत. काहींचा तरवा उगवून बऱ्यापैकी वरती आल्याने लवकरच लावणीच्या कामांना सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70527 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..