‘आरटीई’ अंतर्गत १३२ विद्यार्थी निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीई’ अंतर्गत १३२ विद्यार्थी निश्चित
‘आरटीई’ अंतर्गत १३२ विद्यार्थी निश्चित

‘आरटीई’ अंतर्गत १३२ विद्यार्थी निश्चित

sakal_logo
By

‘आरटीई’ अंतर्गत १३२ विद्यार्थी निश्चित

महेश धोत्रे ः जिल्ह्यात २९३ पैकी १६१ जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्याअंतर्गत (आरटीई) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९ शाळांमध्ये १३२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याआधी १३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यातील ४९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येतो. या ४९ शाळांमध्ये एकूण २९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अपेक्षित आहे. त्यापैकी अद्याप तरी १३२ प्रवेश झाले आहेत. तर अद्यापही १६१ जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश देण्यात येतो. यामध्ये एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच अपंग, दारिद्र्यरेषेखालील सर्व जातीमधील मुलांना या अंतर्गत प्रवेश देण्यात येतो; मात्र प्रवेश घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांपासून प्रवेश घेण्यात येणारी शाळा ही ३ किलोमीटरच्या आतमध्ये असावी.
जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी १९३ अर्ज करण्यात आले होते. यापैकी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १७९ विद्यार्थ्यांची लॉटरी काढण्यात आली. त्यापैकी १३२ जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश देऊन त्याचा खर्च शासन सांभाळत आहे. २०१९ पर्यंत आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांचे पैसे शासनाकडून देण्यात आले आहेत.
---
२५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश
आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील ४९ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्यात देवगड तालुक्यात ८ शाळा, दोडामार्ग २, कणकवली १३, कुडाळ ६, मालवण ५, सावंतवाडी ११, वैभववाडी १ तर वेंगुर्ले तालुक्यात ३ शाळा असे मिळून ४९ शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. यावर्षी १७९ विद्यार्थ्यांची लॉटरी काढण्यात आली. यापैकी १३२ जणांचा प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70546 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top