पावस-आधुनिक तंत्रज्ञानाचा मासेमारीसाठी फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-आधुनिक तंत्रज्ञानाचा मासेमारीसाठी फायदा
पावस-आधुनिक तंत्रज्ञानाचा मासेमारीसाठी फायदा

पावस-आधुनिक तंत्रज्ञानाचा मासेमारीसाठी फायदा

sakal_logo
By

-rat23p5.jpg
KOP22L31243
- रत्नागिरी ः गोळप कट्टा कार्यक्रमात बोलताना अजीम अब्दुल हमीद होडेकर.
-------------
नियम पाळूनच मासेमारी करणे योग्य

गोळप कट्ट्यात अब्दुल होडेकरांनी उलगडला मच्छीमारीचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २३ ः रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये गावातील मच्छीमार व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते अझीम अब्दूल हमीद होडेकर यांनी गोळप कट्टा येथील कार्यक्रमांमध्ये आपल्या जीवन कार्याचा प्रवास उलगडून दाखवला. आपल्याकडे पर्ससीननेट आहे. पण ते बावीस वाव पलीकडे केली जाते. आधुनिक मच्छीमारी तीन महिने बंद असते, ते सुद्धा योग्य आहे. कारण त्या काळात मासे प्रजनन काळ असतो. आम्ही हे नियम पाळतो. मात्र, हल्ली रत्नागिरीच्या समुद्रात बंदीच्या काळात कर्नाटक, गोवा आदी ठिकाणचे ट्रॉलर येऊन मच्छीमारी करतात. कारण रत्नागिरीबाहेर समुद्रात माशांचे मोठे भांडार आहे. त्याचा तोटा होतो. मात्र, नियम आपण पाळले पाहिजेत, असे मत होडेकर यांनी व्यक्त केले.
प्रत्येक मोठ्या माणसाच्या अनुभवाच्या प्रवासाच्या माध्यमातून आपल्या जीवनात काही तरी बदल करून घेता यावा, या हेतूने गोळप कट्टा कार्यक्रमात आयोजन केले जाते. आपला प्रवास सांगताना होडेकर म्हणाले, माझं लहानपण भाट्ये येथे गेलं. मराठी शाळेनंतर रत्नागिरीत शिक्षण झालं. बारावीनंतर मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन अनुभव घेतला. घरी पारंपरिक मच्छीमारी खाडीत सुरू होती. मी सुद्धा लहानपणापासून जात असे. बाबा, काका सगळे मच्छीमारीत प्रवीण होते. मी जरा मोठा झाल्यावर मच्छीमारी करायला लागलो. एक लॉंच होती. नंतर दोन तीन झाल्या, मग ट्रॉलर घेतला. मच्छीमारीबरोबर माशांची स्वतः विक्री, सप्लायर अशी विविध कामे केली. खूप कष्ट घेतले. मासे विक्रीच्या वेळी अनेकदा रात्रभर जागायला लागायचं. कुणाची होडी जेटीला आली की अंदाज घ्यायचा मासे किती मिळाले? कुठे मिळाले? आमची होडी दिसली का? त्याची चौकशी करायची. माहितीचा उपयोग करून घ्यायचा. त्यावेळी संपर्काची आधुनिक साधने नव्हती. मोबाईल, वायरलेस फोन आणि सॅटेलाईट फोनमुळे खूप सोपं झालं. आता थेट बोटीवर संपर्क होतो. फिश फाईंडरमुळे मासे कुठे आहेत, स्क्रिनवर दिसतात. तंत्रज्ञानचा खूप फायदा होतो.
....
चौकट
गोळपला कोविड हॉस्पिटल...
कोविड काळात सहकाऱ्यांच्या साथीने शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी नाश्ता, जेवण देणे, औषध देणे असे रात्रंदिवस करत होतो. मलाही कोविड झाला, पण देवाने मला वाचवले. पण जवळचे नातेवाईक गमावले. कोविड काळात खासगी रुग्णालयातील परिस्थिती पाहून सर्वसामान्यांसाठी कोविड हॉस्पिटल काढावे, असे वाटले. आमच्या मित्रांच्या ट्रस्टमार्फत मदरसा चालवतो. गोळपला तिथे ट्रस्टमार्फत कोविड हॉस्पिटल सुरू केले. तिथे दोनशे वीस रुग्ण होते आणि एकही न दगावता सगळे बरे होऊन गेले. कित्येक गरीब लोकांना अत्यल्प खर्चात उपचार दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70674 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top