निवतीतील बेकायदा मासेमारीबाबत निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवतीतील बेकायदा मासेमारीबाबत निवेदन
निवतीतील बेकायदा मासेमारीबाबत निवेदन

निवतीतील बेकायदा मासेमारीबाबत निवेदन

sakal_logo
By

''ध्यास''तर्फे वराडमध्ये
शैक्षणिक साहित्य
मालवणः वराड-सावरवाड येथील जिल्हा परिषद शाळेत ध्यास फाउंडेशनतर्फे सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष धोंडी फाटक, उपाध्यक्ष युवराज ढोलम उपस्थित होते.
..........
निवतीतील बेकायदा
मासेमारीबाबत निवेदन
मालवणः पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत निवती बंदरातून यांत्रिक नौका बेकायदेशीर मासेमारी करीत असल्याची लेखी तक्रार नजीकच्या कोचरा-श्रीरामवाडीतील मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे केली आहे. निवती बंदरातील मत्स्य खात्याच्या जमिनीमध्ये अनेक बेकायदा व अनधिकृत बांधकामे झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या मच्छीमारांनी केली आहे. श्रीरामवाडीतील मच्छीमारांनी मागण्यांचे निवेदन बुधवारी सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांना सादर केले. या दोन्ही प्रश्नांसंदर्भात श्रीरामवाडीतील मच्छीमारांचे शिष्टमंडळ लवकरच मत्स्यविकास मंत्री तसेच मत्स्य आयुक्तांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजन खवणेकर, सचिव शैलेश कोचरेकर, खजिनदार जगदीश केरकर, विठोबा कोचरेकर यांच्यासह सुमारे ६० जणांच्या सह्या आहेत.
.............
दाखले वेळेत देण्याची
शिवसेनेची मागणी
सावंतवाडीः नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे दाखले वेळेत मिळणे आवश्यक आहेत. ते दाखले वेळेत मिळावेत तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले वेळेत देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना पदाधिकारी आणि संजय गांधी निराधार समितीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार मनोज मुसळे यांची भेट घेऊन दिले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशोक दळवी, गजानन नाटेकर, नारायण राणे, भारती मोरे, शैलेश गवंडळकर, संजय माजगावकर, एकनाथ हळदणकर, विश्वास घाग, मंगलदास देसाई, रामचंद्र चराटकर, शिवराम सावंत आदी उपस्थित होते.
..............
इन्सुलीत फवारणी
तंत्राचे प्रात्यक्षिक
सावंतवाडीः तालुक्यातील इन्सुली गावात आदर्श फवारणी तंत्र-फवारणी दरम्यान घेतलेली जाणारी सावधगिरी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती आली. तसेच या कार्यक्रमातून फवारणी करताना कोणत्या गोष्टी वापराव्यात, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील महिला, बचतगटातील शेतकरी महिला, कृषी सहाय्यक सीमा घाडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन गावात उपस्थित असलेल्या मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी संस्कृती साळगावकर, मनाली शिंदे, वैभवी भुवड, प्रिया नंदेश्वर, वेदिका साळवे, मिताली उळे, हर्षाली राठोड यांनी केले होते.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70684 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top