
देवराईंच्या पुनरुज्जीवनासाठी कलंबिस्त-गणशेळवाडीतील तरुणांचा पुढाकार
swt234.jpg
31249
कलंबिस्त : येथील श्री देवी सातेरी मंदिर परिसरातील देवराईला पुनर्जीवन देण्याच्या दृष्टीने फळझाडे लागवड व देवराई बचाव अभियान राबवताना महादेव उर्फ भाई सावंत, उत्तम सावंत, प्रकाश गावडे, संदीप सावंत, अनिल सावंत, अरुण सावंत, रवीकमल सावंत, दीपक सावंत आदी.
देवराईंच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार
कलंबिस्त-गणशेळवाडीतील तरुणांकडून वृक्षारोपण; पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा गावात असलेल्या देवराई दृष्टीआड होत चालल्या आहेत. या देवराईचे पुनरुज्जीवन होऊन त्या टिकवण्यासाठी कलंबिस्त-गणशेळवाडी येथील तरुणांनी पुढाकार घेत कुलदैवत श्री देवी सातेरी मंदिर परिसरातील देवराई जागेत वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
या कार्यात प्रशासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीनी पुढाकार घेतला असून त्यात पोलीस महादेव उर्फ भाई सावंत, तलाठी तथा माजी सैनिक उत्तम सावंत, पोलीस सेवेत असलेले माजी सैनिक प्रकाश गावडे या तिघांचा सहभाग आहे. त्यांनी देवराई टिकविण्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी श्री देवी सातेरी मंदिर परिसरातील पूर्वीच्या देवराई असलेल्या मोकळ्या जागेत फळझाडे, फुलझाडे स्व-खर्चातून देऊन सुमारे शंभर विविध प्रकारची झाडे त्यांची लागवड करून नष्ट झालेल्या देवराईला पुन्हा पुर्नजिर्वित करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाला गावातील अनिल सावंत, रवीकमल सावंत, माजी सैनिक संदीप सावंत, माजी सैनिक अरुण सावंत, दीपक सावंत, कमलाकर सावंत, रघुनाथ उर्फ मिंटू सावंत, सचिन सावंत, सोमकांत सावंत, शैलेश सावंत, महेश सावंत, कृष्णा सावंत, माजी सैनिक विलास सावंत, सुनील सावंत, भिकाजी सावंत, सुनील तावडे, भालचंद्र सावंत, निलेश सावंत, सिद्धेश सावंत, शेखर मेस्त्री, विजय कदम, आदी तरुणांनी पाठींबा दर्शविला आहे. येथील मंदिर परिसरात पावसाळी ऋतूत ओसंडून वाहणारा धबधबा वर्षा पर्यटनासाठी गेल्या काही वर्षापासून आकर्षित होत आहे. येत्या काळात या भागात जर रस्ते वाहतूक व दळणवळणाची सोय झाल्यास आणि देवराई संवर्धन जतन उपक्रमाच्या माध्यमातून हा मंदिर परिसर एक वेगळा आकर्षण केंद्र ठरविण्याठी माजी सैनिक आणि प्रशासनातील कलंबिस्त गावातील तरुणांनी देवराई पुनर्जीवित अभियान हाती घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराई नष्ट झालेल्या गावांना नवा अध्याय घालून दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70685 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..