रत्नागिरी ः नेमके गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः नेमके गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले
रत्नागिरी ः नेमके गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले

रत्नागिरी ः नेमके गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले

sakal_logo
By

रेल्वे चित्र वापरा
....
कोरेचे विद्युतीकरण मोदींमुळेच शक्य

माजी खासदार नीलेश राणे; मागणीचे महत्व पंतप्रधानांनाच समजले, गाड्यांची संख्या वाढणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व्हावे ही कोकणवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी मी सुद्धा पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता; मात्र त्या वेळी धूळखात पडलेल्या या मागणीचे गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले आणि त्यांच्याच हस्ते आरंभ झाला, ही नियतीचीच इच्छा होती, असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.
कोकण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून झाले. तर रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावरून विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गावरून पहिली ट्रेन धावली. याचे कोकणवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. या वेळी माजी खासदार नीलेश राणे म्हणाले की, रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची आमची अनेक वर्षांची मागणी होती. यासाठी मी सुद्धा खासदारकीच्या पाच वर्षांच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता; मात्र त्या वेळी आमची मागणी धूळ खात पडली होती; परंतु या विद्युतीकरणाचे महत्त्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणले आणि त्यांच्या कार्यकाळात रेकॉर्ड टाईममध्ये पूर्णदेखील केले. याबद्दल पंतप्रधानांचे आम्ही कोकणवासीय आभारी आहोत.
..
चौकट
इंधनखर्चावर मोठी बचत होणार
या विद्युतीकरणाचा नेमका फायदा येत्या काळात समजणार आहे. या एका ऐतिहासिक बदलामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. निसर्गरम्य कोकणातील प्रदूषण कमी होणार असून, इंधनखर्चावर मोठी बचत होणार आहे. या सर्व बदलामुळे कोकण रेल्वेमध्येदेखील आमूलाग्र बदल होणार आहेत. असे हे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच व्हावे हीच कदाचित नियतीची इच्छा होती, म्हणूनच इतक्या वर्षानंतर हे महत्त्वाचे काम पूर्णत्वाला गेले आहे, असे राणे म्हणाले.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70691 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top