
राजापूर-101 हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
rat23p13.jpg
31283
ः राजापूर ः वाडापेठ येथे लोकांशी संवाद साधताना कृषिविस्तार अधिकारी प्रभाकर आपटे. या वेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.
--------------
फळबाग लागवडीचे १०१ हेक्टरवर उद्दिष्ट
कृषिविस्तार अधिकारी पंडित; राजापुरला २० हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि अन्य योजनेंतर्गंत वृक्षलागवडीसह फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गंत तालुक्यात १०१ हेक्टर लागवड तर वृक्षलागवडींतर्गंत २० हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी दिली.
या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावोगावी ग्रामपांयतीच्या माध्यमातून बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी अधिकारी, पाच विस्तार अधिकारी, मग्रारोहयोजनेचे संबंधित कार्यक्रम अधिकारी यांची नियुक्ती केल्याचे पंडित यांनी स्पष्ट केले. वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड होऊन त्या माध्यमातून तालुक्याचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे प्रयत्न पंचायत समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जात आहे. त्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमार्फत गावोगावी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमाचा लाभ लोकांनी घेऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त फळबाग लागवड आणि वृक्षलागवड करावी, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.
------------
चौकट
कृषी स्वावलंबन योजना
शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत असून, त्याचा लाभ एस्सी प्रवर्गातील लाभार्थ्यांना होणार आहे. या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना विहीर बांधकामासाठी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक लाभार्थ्याकडे किमान ४० गुंठे जागा असणे गरजेचे असून दीड लाख उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, सहहिश्शेदारांची संमतीपत्र आदी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुहास पंडित यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70744 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..