ओवळीये हायस्कूलच्या उर्वी सावंतचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओवळीये हायस्कूलच्या उर्वी सावंतचा गौरव
ओवळीये हायस्कूलच्या उर्वी सावंतचा गौरव

ओवळीये हायस्कूलच्या उर्वी सावंतचा गौरव

sakal_logo
By

ओवळीये हायस्कूलच्या उर्वी सावंतचा गौरव
ओटवणेः ओवळीये येथील सेवाभावी व्यक्तिमत्व भरत शिरोडकर यांनी आपले भाऊ (कै.) वसंत शिरोडकर यांच्या स्मरणार्थ देवसू माध्यमिक विद्यालयातून दहावीत प्रथम येणाऱ्याला यंदापासून ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे. यावर्षी हे पारितोषिक उर्वी सावंत या विद्यार्थिनीला वितरण करण्यात आले. यावेळी श्री. शिरोडकर यांनी प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवू सावंत आणि मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी सचिव प्रमोद परब, मानकरी विठ्ठल सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत, पारपोलीचे मानकरी शंकर परब, माजी उपसरपंच संदेश गुरव, निवृत्त वनक्षेत्रपाल बी. एम. परब, राजेश परब, ओवळीये उपसरपंच सागर सावंत, मोहन गवस, मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ, सहाय्यक शिक्षक श्री. डांगी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70776 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top