
संक्षिप्त
योगासन करणे गरजेचेः सुर्वे
चिपळूण ः योगासने केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होतो. निरोगी आरोग्यासाठी योगासने हा जीवनातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आजच्या युगात योगासन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शैलेश सुर्वे यांनी केले. योगदिननिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, पाग येथे आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी शैलेश सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका मानसी शिर्के यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उषा आवळे यांनी योगासनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले. सुभाष बावधाने याच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली. यामध्ये ताडासन, वृक्षासन इ. आसनांचा समावेश होता.
-----------
परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये सभा
चिपळूण ः श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक सभा झाली. या वेळी शिक्षक-पालक संघ तयार करण्यात आला. मुख्याध्यापक सुभाष जाधव हे पदसिद्ध अध्यक्ष तर वेदिका बुरटे, ईश्वर चौधरी, मानसी वाघे, मानसी सांगले, भाग्यश्री पोवार, विष्णू हरवडे, सुशील बेलवलकर, सरिता माळी, अस्मिता कालसेकर, दीक्षा भोसले, सीताराम जाधव यांची पालक प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक सुभाष जाधव, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, सदस्य विनोद फणसे आदी उपस्थित होते.
---------------
खेर्डी-चिंचघरी विद्यालयात योग दिन
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित शिशुविहार खेर्डी चिंचघरी (सती) या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे सोप्या भाषेत महत्त्व पटवून दिले. दररोज व्यायाम करून कसे तंदुरुस्त राहिले पाहिजे, हे सांगितले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी चिमुकल्यांना व्यायामाचे छोटे-छोटे प्रकार करून दाखवले. या वेळी मुख्याध्यापिका ममता ठसाळे यांनी विद्यार्थ्यांचेदेखील कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे, दीक्षा परब, तन्वी लटके, साक्षी जाधव तसेच मदतनीस चाळके यांनी विशेष मेहनत घेतली.
---------------
लोटेतील सराफ हायस्कूलचे यश
चिपळूण ः खेड तालुक्यातील लोटे येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कविता विनोद सराफ हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयातील ईश्वरी बोरसुतकर हिने ९३.२० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक, भक्ती महाडिक हिने ९३ टक्के प्राप्त करत द्वितीय तर सेजल आंब्रे हिने ९०. ६० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष अंकुश काते, उपाध्यक्ष बाबूजी घाग, स्कूल कमिटी चेअरमन डॉ. प्रशांत पटवर्धन, सेक्रेटर मोहन वारणकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70782 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..