
रत्नागिरी ः क्राईम
कत्तलीसाठी जनावरे वाहतूक,
आणखी एकाला अटक
रत्नागिरी ः निवळी येथे पाच जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या कोल्हापूर येथील दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांकडून जनावरांसह ४ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यातील आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. महेश दिलीप साने (वय २८, रा. शाहूवाडी-कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. यातील आणखी एक संशयित अय्याज कादीर कापडी (रा. कोंडिवरे, ता. संगमेश्वर) हा अद्यापही नजरे आड आहे. यापूर्वी पोलिसांनी कोल्हापूर येथील दोघांना अटक केली होती. न्यायालयाने गुरुवारी (ता. २३) जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही घटना सोमवारी (ता. २०) पहाटे पाच वाजता निवळी येथील ग्रीन पार्क हॉटेलच्या अलीकडील वळणावर निदर्शनास आली होती. संशयितांनी बेकायदेशीर पाच जनावरे कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप वाहनमधून (एमएच-११-एजी-९३१०) कमी उंचीच्या वाहनातून गायी व पाड्यांचे तोंडाला व शिंगाना अखंड नायलॉन रशीने बांधून त्यांना पुरेसे अन्न व पाणी न देता क्रुरतेने वागणूक देऊन नेत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी सागर प्रकाश कदम (वय ३१, रा. कदमवाडी, हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. तपासात पोलिसांनी आणखी एक संशयित महेश साने याला अटक केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
---------
एसटी-मोटारीची धडक, चालकावर गुन्हा
पावस ः पावस- नाखरे मार्गावर एसटी बसने मोटारीला धडक देऊन दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक प्रशांत पाटील यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर भुजंग हाके (३२, गंगाखेड, परभणी, सध्या एसटी डेपो रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एसटी घेऊन नाखरे-खांबड ते पावसमार्गे जात होता. या वेळी पावस ते गावडेआंबेरे अशा जाणाऱ्या मोटारीला समोरून धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70838 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..