३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

-rat२३p२५.jpg
L३१३३९
- रत्नागिरीःः मिरजोळे येथे हातभट्टी अडयावर पोलिसांची धाड.
-------------
मिरजोळेत दारु अड्यावर छापा; तिघांना अटक

८७ हजाराचा मुद्देमाल जप्त; संशयितांना दोन दिवसाची कोठडी
रत्नागिरी, ता. २३ः शहरानजीकच्या मिरजोळे येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तब्बल ७२ हजाराची ४८ लिटर गावठी दारू व इतर साहित्यसह आणि तीन दुचाकी असा एकूण ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अमोल पाटील, सुनील पाटील, संतोष सकपाळ (सर्व रा. पाटीलवाडी-मिरजोळे) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (ता. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास केली. ग्रामीण पोलिस स्थानकाचे नाईक राहूल पावसकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके, नाईक राहूल पावसकर, अमित कदम, उमेश गायकवाड, हवालदार उदय वाझे, कॉन्स्टेबल निकेतन शिंदे, अतुल कांबळे यांनी केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके करत होते. तपासात पोलिसांनी संशयितांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70840 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top