पतन अभियंता, ठेकेदाराविरोधात देवगडात पोलिसांत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतन अभियंता, ठेकेदाराविरोधात देवगडात पोलिसांत गुन्हा दाखल
पतन अभियंता, ठेकेदाराविरोधात देवगडात पोलिसांत गुन्हा दाखल

पतन अभियंता, ठेकेदाराविरोधात देवगडात पोलिसांत गुन्हा दाखल

sakal_logo
By

पतन अभियंता, ठेकेदाराविरोधात
देवगडात पोलिसांत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ः तालुक्यातील मिठबांव खाडी परिसरात मासे सुकवण्यासाठी ओट्याचे बांधकाम करतेवेळी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींचा भंग केला. तसेच सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबधित सहायक पतन अभियंता तसेच संबधित ठेकेदार यांच्याविरूध्द येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. डिसेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ च्या मुदतीत ही घटना घडली होती. याप्रकरणी महसूल उपविभागीय अधिकारी (कणकवली) तथा तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती अध्यक्षा वैशाली राजमाने यांनी तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींचा भंग करून तसेच सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून मासे सुकवण्यासाठी ओट्याचे बांधकाम करतेवेळी कांदळवन प्रजातीमधील सुमारे पाच तसेच इतर प्रजातीमधील सुमारे १७ झाडांची विनापरवाना तोड केली, याप्रकरणी संबधित बांधकाम करणारे ठेकेदार आणि संबधित सहाय्यक पतन अभियंता यांच्याविरूध्द येथील पोलिसात तक्रार दिली आहे. अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70882 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top