22 गावातील रुग्णसेवा वार्‍यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

22 गावातील रुग्णसेवा वार्‍यावर
22 गावातील रुग्णसेवा वार्‍यावर

22 गावातील रुग्णसेवा वार्‍यावर

sakal_logo
By

सिद्धेश तुरळकर याचे यश
संगमेश्वर ः संगमेश्वरचा सुपुत्र सिद्धेश तुरळकर याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून एमबीबीएस डीग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. तुरळ गावात प्रथम डॉक्टर होण्याचा मानही त्याने मिळवला आहे. साईनगर कुवारबाव येथे राहत असलेल्या विजय शंकर तुरळकर यांचा तो सुपुत्र असून, त्याने एमबीबीएस या डॉक्टरी डिग्रीमध्ये प्रथम श्रेणी संपादन केली आहे. तुरळ गावात तुरळकर आणि चव्हाण कुटुंबात प्रथम एमबीबीएस होण्याचा मान त्याने मिळवल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------
-rat24p2.jpg
31436
ः रत्नागिरी ः मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करताना विद्यार्थी.
-----------
मत्स्य अभियांत्रिकी कॉलेजमध्ये योगदिन
रत्नागिरी ः शहरानजीक शिरगाव येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगेश शिरधनकर यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व विषद केले. योग प्रशिक्षणामध्ये मंगेशकुमार पाटील व नीलेश मिरजकर यांनी योग प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन केले.
------
सर्वोदय छात्रालयात प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरी ः येथील सर्वोदय छात्रालयात कोविड-१९ च्या महामारीनंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावीनंतर रत्नागिरीत उपलब्ध असलेल्या सर्व शिक्षण शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्याना त्यांची जात, धर्म विचारात न घेता गरज व गुणवत्ता या निकषांवर प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे यावर संस्थेचा कटाक्ष असतो. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पांडुरंग पेठे, विश्वस्त, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट, रत्नागिरी नरेंद्र खानविलकर, व्यवस्थापक यांच्याशी अथवा सर्वोदय छात्रालय, डॉ. बा. ना. सावंत रोड, रत्नागिरी येथे सकाळी ११ ते २ या वेळेत संपर्क साधावा.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71031 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top