नाटेकर बालकमंदिरात शिशुवाटिका शिक्षणाविषयी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटेकर बालकमंदिरात शिशुवाटिका शिक्षणाविषयी मार्गदर्शन
नाटेकर बालकमंदिरात शिशुवाटिका शिक्षणाविषयी मार्गदर्शन

नाटेकर बालकमंदिरात शिशुवाटिका शिक्षणाविषयी मार्गदर्शन

sakal_logo
By

शिशुवाटिका शिक्षणाविषयी मार्गदर्शन
रत्नागिरी ः (कै.) ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या (कै.) जयराम शंकर नाटेकर बालकमंदिरच्या पालकांची सभा रंजन मंदिरात झाली. या पालक सभेत नवीन शैक्षणिक धोरण आणि शिशुवाटिका शिक्षण या विषयावर विद्याभारतीचे शिशुवाटिका प्रमुख सदाशिव उपाले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आसक्ती भोळे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्या डॉ. कल्पना मेहता यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शन केले व शाळेला नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्याभारती रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यकर्ते शरद मुसळे, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. विभागप्रमुख कामिनी महाडिक यांनी आभार मानले.
--------------
अभ्यंकरमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया
रत्नागिरी ः अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. २७ जूनपासून विद्यार्थी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर असलेल्या लिंकद्वारे प्रवेशपूर्व नोंदणी करू शकणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बोर्डाचे विद्यार्थी या वेबसाईटवर असलेली लिंक भरून आपले प्रवेशपूर्व नोंदणी करू शकतील. महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या विभागांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी एकाच लिंकद्वारे नोंदणी करता येईल. गुणवत्ता यादी लागल्यानंतरची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया शासनाकडून प्रवेशासंबंधीचे अधिकृत परिपत्रक आल्यावर सुरू करण्यात येईल, असे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी कळविले.
----------
मत्स्य अभियांत्रिकी पदविका
अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया
रत्नागिरी ः कोकणकृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य अभियांत्रिकी विषयात पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०११-१२ पासून सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून प्रवेशअर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रमाचे स्वरूप याबाबत माहिती www.dbskkv.org या विद्यापीठ संकेतस्थळावर २९ जूनपासून उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता ३० असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगांव या पत्त्यावर अथवा dfertg२०११@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
-------------
पोदार इंटरनॅशनलमध्ये योगदिन
रत्नागिरी ः येतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा झाला. शाळेच्या परिपाठामध्ये योगदिनाचे महत्व सांगणारा अग्रलेख सादर करण्यात आला. परिपाठानंतर प्रत्येक वर्गात मुलांना योगाचा इतिहास तसेच विविध प्रकारचे योगासने या संदर्भातील चित्रफित दाखवण्यात आली. मुलांनी विविध प्रकारची आसने, सूर्यनमस्कार यांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्व सांगितले. हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आला.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71113 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..