रत्नागिरी ः शाळाबाह्य मुलांना आणणार शिक्षण प्रवाहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः शाळाबाह्य मुलांना आणणार शिक्षण प्रवाहात
रत्नागिरी ः शाळाबाह्य मुलांना आणणार शिक्षण प्रवाहात

रत्नागिरी ः शाळाबाह्य मुलांना आणणार शिक्षण प्रवाहात

sakal_logo
By

31617ः संग्रहीत
......
विद्यार्थ्यांची गळती येणार शून्यावर

५ ते २० जुलैपर्यंत ''झिरो ड्रॉपआऊट'' मोहीम; शाळाबाह्य मुले येणार शिक्षण प्रवाहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीत मिशन ''झिरो ड्रॉपआऊट'' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शाळेच्या पटावर नोंदवले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बऱ्‍याच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतरित झाली. त्या स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्रात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवण्यात आली आहे. मिशन झिरो ड्रॉपआऊट अंतर्गत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू ठेवणे व बालकांची गळती शून्यावर आणणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. ५ ते २० जुलै २०२२ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
शाळाबाह्य मुलांना दाखल करून घेताना ढोलताशांच्या गजरात दिंडी काढून स्वागत केले जाईल. शाळाबाह्य बालकांच्या शोधमोहिमेसाठी घरोघरी बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरित कुटुंबांमधून करण्यात याव्यात. तसेच मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात येणार आहे.
....
चौकट
..यांचाही समावेश करावा
महिला बालविकासाअंतर्गत बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशनमध्ये समावेश करण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.
..
चौकट
खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे...
महाराष्ट्रातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे व शेतमळ्यात, जंगलात वास्तव्य करणाऱ्‍या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71184 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top