छायाचित्र प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद
छायाचित्र प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद

छायाचित्र प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद

sakal_logo
By

31631
मुंबई ः प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी करताना मान्यवर.

छायाचित्र प्रदर्शनास
मुंबईत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ ः आडाळी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासक प्रकाश कदम यांच्या निसर्ग छायाचित्रांचे आणि योगाचे महत्त्व या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन भारत सरकारच्या मुंबई येथील रक्षा मंत्रालयात (डीजीक्यूए) भरविण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरवर्षी योगदिन २१ जूनला संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ‘डीजीक्यूए’ कार्यालयात योगासने व प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच श्री. कदम यांना ‘योगाचे महत्त्व’ आणि ‘पर्यावरणीय विज्ञान’ विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्याची संधी देण्यात आली. श्री. कदम यांनी अतिशय मेहनतीने संपूर्ण भारतभर भ्रमण करून टिपलेली छायाचित्रे प्रदर्शनात मांडली. पशु-पक्षी, प्राणी, जैवविविधतेसह कोकणातील जीवनही प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य अधिकारी कर्नल डी. बी. एस. कुशवाह, प्रशासन अधिकारी कृष्णा डेकाटे, संजीव चौधरी, सुरक्षा अधिकारी सौरभ भटनागर आणि इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्री. कदम यांची प्रशंसा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71297 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..