सदर ः संस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः संस्कृती
सदर ः संस्कृती

सदर ः संस्कृती

sakal_logo
By

(संस्कृती ...................लोगो)
१९ जून पा. १०२ वर सदर लागले आहे.
.....
rat25p2.jpg
31622
ः अंजली बर्वे
.....
इंट्रो
समाजभान जपणारी अनेक माणसे, गट, संघटनां आपापल्यापरिने जनजागृती आणि कार्य करत आहेत. पाणी, पूर, झाडे, प्लास्टिक वापर, पर्यावरण अशा अनेक बाबींवर विचार, उपचार, उपाय करण्याची आज नितांत गरज आहे. आपल्या संतांनी जसा समाजप्रबोधनासाठी भक्तिमार्गाचा उपयोग करून घेतला आणि सन्मार्ग दाखवला तसाच प्रयत्न आजही करता येईल. चातुर्मासाच्या भक्तिमार्गामध्ये आपण सामाजिक कार्याची बाग फुलवू शकतो. प्रत्येकाने फक्त चार महिने जरी पर्यावरणपूरक वर्तन केले तरी निसर्गदेवता प्रसन्न होईल आणि शुद्ध हवेचा प्रसाद देईल. मानसशास्त्राच्या वर्तन चिकित्सेनुसार चार महिने नेमाने केलेले काही चांगले बदल आपसूकच अंगवळणी पडतील. आधुनिक काळात चातुर्मासाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले की, बदलत्या संस्कृतीची आगळी-वेगळी रूपे समोर येतात. परंपरेला कवटाळून न राहता त्यातही नवता शोधावी लागेल.
ः-अंजली बर्वे, चिपळूण
---------------------
आधुनिक संस्कृतीतील चातुर्मास

वटपौर्णिमा झाली की, पुढे सणवार, व्रतवैकल्ये यांची चाहूल लागते आणि त्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक तयारी सुरू होते. मनावर काही बंधने घालायला शिकवणारा श्रावण आणि नित्यनेमाने व्रतस्थ राहायला शिकवणारा चतुर्मास आता जवळ आला आहे, म्हणून त्याचा विचार आधी करू. आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी येते, तिथपासून श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिकी एकादशीपर्यंतचा कालावधी चातुर्मासात गणला जातो. अशी धारणा आहे की, या दिवसात श्री विष्णू क्षीरसागरात विश्रांती घेत योगनिद्रेमध्ये असतात. त्यांच्यासह सर्व देवही! फक्त भगवान शंकर सृष्टीच्या पालनासाठी जागे असतात म्हणून या काळात सात्विक वृत्तीची वाढ होईल, अशी व्रते सांगितली जातात.
या काळात तमोगुण वाढू नये, यासाठी मनाला आणि शरीराला व्यस्त ठेवणारी व्रते सांगितली आहेत. या काळात मांसाहार करणारे बहुसंख्य लोक श्रावण पाळतात, म्हणजेच अंडी, मासे, मांस काहीही खात नाहीत. काही लोक पूर्ण चातुर्मासात हे पदार्थ वर्ज्य करतात. या चार महिन्यात अन्नदान, देवदर्शन, देवाला फुले वाहणे, कीर्तन, प्रवचन, सदग्रंथ श्रवण करणे अशा प्रकारचे व्रत काहीजण स्वीकारताना दिसतात. काहीजण एकभुक्त राहतात. या सगळ्या व्रत, नेम यातून शिस्त, संयम, दातृत्व, समाजभान जपले जाते, हे महत्वाचे!
आपल्या कोकणात, विशेषत्वाने खेड्यात अजूनही अशी व्रते करणाऱ्‍या स्त्रिया आपण पाहतो. यातील काही सुंदर प्रथा जतन करण्याजोग्या आहेत. एक नेम आहे, तो ''बाळ भूक''. एखाद्या गरीब घरातील मुलाला रोज दुपारी जेवायला घालणे किंवा शाळेच्या वेळेमुळे जमत नसेल तर संध्याकाळी खाणे देणे, हे झाले अन्नदान! तर दुसरे आहे ते ज्ञानदान! चार महिने गणित, संस्कृत, श्लोक, आपले जे धर्मग्रंथ, पुराण इ. ठेवा आहे, त्यातील कथानक म्हणजे रामायण, महाभारत, भागवत नियमित सांगणे आणि श्रवण करणे इ. विनामोबदला शिकवणे, कथा सांगणे, वाचता न येणाऱ्‍या ज्येष्ठांना वर्तमानपत्र वाचून दाखवणे, वृद्धाश्रमात काही उपक्रम करणे, अशा अनेक छान, उपयुक्त उपक्रमातून आज चातुर्मासात नेम केले जातात.
ज्या विष्णूच्या भक्तीसाठी आपण हे व्रत करणार तो विष्णू म्हणजे कोण? तर सर्व विश्व ज्याने व्यापले आहे, तो! आपणही त्या विश्वाचे घटक आहोत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की, ''वैष्णवांचा धर्म | जग विष्णू नेणे धर्म।।'' या चराचर सृष्टीमध्ये ईश्वराचा अंश आहे आणि त्यामुळे मनुष्य, प्राणिमात्र, पशुपक्षी, वृक्षवल्ली, नदी, समुद्र, पर्वत या सर्वांचे हित जपणे हीच खरी ईश्वरसेवा होईल. ''खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे'', या मतीनुसार ''जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा||'' हे विचार जरी आपण आचरणात आणले तरी चातुर्मासात व्रत केल्याचे समाधान आपल्याला मिळेल आणि चार महिन्यात तनामनाने केलेले हे कार्य आपल्यात बदल घडवेल. या वर्षी १० जुलैला आषाढी एकादशी येत आहे आणि चातुर्मास ४ नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशीला संपत आहे. आपण समाजोपयोगी कोणत्या गोष्टी आपापल्या कुवतीनुसार करू शकतो, याचा प्रत्येकाने विचार करूया आणि आपल्या संस्कृतीने परंपरेने जपलेल्या या रूढींचा नव्याने विचार करूया. वारकऱ्यांची वारी पंढरपूरला निघाली आहेच. आपण सद्विचारांची साथ त्यांना देऊया आणि शुभ चिंतन करूया.
-------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71304 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top