पाग इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाग इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन
पाग इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन

पाग इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन

sakal_logo
By

पाग इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, पाग येथे आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षिका मानसी शिर्के यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उषा आवळे यांनी योगासनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले. सुभाष बावधाने याच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली. यामध्ये ताडासन, वृक्षासन इ. आसनांचा समावेश होता. योगासने केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होतो. निरोगी आरोग्यासाठी योगासने हा जीवनातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आजच्या युगात योगासन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शैलेश सुर्वे यांनी केले.
-----------
नॅशनल हायस्कूलमध्ये योगाची प्रात्यक्षिके
दाभोळ ः दापोली येथील नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक अय्युब मुल्ला उपस्थित होते. ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. अस्मिता कानडे यांनी योग दिनाबद्दल सविस्तर माहिती दिली. योग मार्गदर्शकांनी योगासनांचे विविध प्रकार व त्याचे होणारे फायदे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना करून दाखवले. सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रकार मोठ्या उत्साहाने पूर्ण केले.
---------
मोतीवाले हायस्कूलमध्ये योग दिन
चिपळूण ः श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी निरामय आरोग्य केंद्राच्या योगशिक्षिका मनीषा दामले व सर्व योगसाधकांनी विविध योगा आसनांच्या प्रात्यक्षिकासह आपल्या जीवनातील योगासनांचे महत्त्व पटवून दिले. या वेळी परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष जाधव, श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सई वरवाटकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, विश्वस्त डॉ. मीनल ओक, सदस्य मल्लेश लकेश्री, आनंदराव पवार महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी योगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
-------------
फोटो काल सोडला.
-rat23p22.jpg
31333
ः साखरपा ः वह्या वाटप करताना ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित.
-----------
कनकाडी शिंदेवाडी शाळेत वह्या वाटप
साखरपा ः कनकाडी शिंदेवाडी शाळेत शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. या शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित उपस्थित होत्या. या वेळी शिक्षक सतीश वाकसे यांनी शासनाकडून देण्यात येणार्‍या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. त्यानंतर पंडित यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या दिल्या. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करण्यासाठी पुस्तकेही लवकरच देणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. कनकाडी गावाची निवड माझी वसुंधरा योजनेत झाली आहे. त्या अंतर्गत लवकरच वन्यवृक्षांची लागवड होणार आहे. या लागवडीत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन पंडित यांनी केले.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71305 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..