मळगावात 3 जुलैला बुद्धीबळ प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगावात 3 जुलैला बुद्धीबळ प्रशिक्षण
मळगावात 3 जुलैला बुद्धीबळ प्रशिक्षण

मळगावात 3 जुलैला बुद्धीबळ प्रशिक्षण

sakal_logo
By

मळगावात ३ जुलैला
बुद्धिबळ प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः मळगाव येथील (कै.) उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथील मुक्ताई अॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ३ जुलैला एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात सकाळी नऊ ते दीड दरम्यान होणार आहे. या शिबिरात पहिलीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभाग घेता येईल. शिबिरात मुक्ताई ॲकॅडमीचे श्री. कौस्तुभ पेडणेकर व त्यांचे राज्य; तसेच राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी केवळ ४० प्रशिक्षणार्थी सहभाग घेऊ शकतात. इच्छुकांनी आपली नावनोंदणी मळगाव वाचनालयात कार्यालयीन वेळेत करावी. अधिक माहितीसाठी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, गुरुनाथ नार्वेकर, बी. स. मुळीक यांच्याशी संपर्क साधून ३० पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन वाचनालयाचे संचालक मंडळ व मुक्ताई ॲकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71333 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top