मंत्रिपद लाटण्यासाठीच केसरकरांची फितुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रिपद लाटण्यासाठीच केसरकरांची फितुरी
मंत्रिपद लाटण्यासाठीच केसरकरांची फितुरी

मंत्रिपद लाटण्यासाठीच केसरकरांची फितुरी

sakal_logo
By

31679
जयेंद्र परुळेकर

मंत्रिपद लाटण्यासाठीच
दीपक केसरकरांची फितुरी
डॉ. परुळेकर ः भाजपमध्ये विलीनीकरणाचा डाव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः मंत्री आणि पालकमंत्रिपद लाटण्यासाठी आमदार दीपक केसरकर शिवसेनेशी फितुरी आणि दगाफटका करून शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत; मात्र तीन वर्षांपूर्वी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराविरोधात ज्यांनी निवडून दिले, ती सावंतवाडी मतदारसंघातील जनता त्यांना माफ करेल का? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. याबाबत श्री. परुळेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिकांच्या आणि सामान्य जनतेच्या तीव्र भावना बघता आता शिंदे गटातील फितूर आमदार टोळीने आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असे ठेवण्याचे नाटक रचले आहे. ‘बाळासाहेब’ हे पवित्र नाव फुटीरांनी उच्चारणे, हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे. ही सगळी उठाठेव करत फितुरांचा गट भाजपमध्ये विलीन करून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आहे, हे उघड आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्याच्या शेड्युल १०च्या ४ क्रमांकाच्या अधिनियमानुसार बंडखोर गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन होणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील आमदारांची आमदारकी रद्द होऊ शकते. म्हणजे दिखावा करायला गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ ठेवायचे आणि कमळ हातात घेऊन मंत्रिपद लाटायचे, यासाठीच खरा उपद्व्याप आहे. यासाठीच सुरत आणि गुवाहाटी येथील फाईव्ह स्टार टुरिझम भाजपने प्रायोजित केलेला आहे. श्री. केसरकर हे आता या फितूर गटाचे प्रवक्ते झाल्याचे कळते. पत्रकात पुढे म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराविरोधात सावंतवाडी मतदारसंघातील सामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने केसरकरांना निवडून दिले. आता फितुरी करून दगाफटका देऊन भाजपमध्ये विलीन होण्याची ही मंत्री आणि पालकमंत्री पद लाटण्यासाठी चाललेली त्यांची धडपड कोकणातील जनता बघत आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71347 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top