कुडाळात उद्या ‘करियर क्लिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात उद्या ‘करियर क्लिक’
कुडाळात उद्या ‘करियर क्लिक’

कुडाळात उद्या ‘करियर क्लिक’

sakal_logo
By

कुडाळात उद्या ‘करियर क्लिक’

प्रणय तेली ः दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी मार्गदर्शन शिबिर

कुडाळ, ता. २५ ः महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) सिंधुदुर्ग विभाग आयोजित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ‘करियर क्लिक’चे मोफत आयोजन सोमवारी (ता. २७) सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत केले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी जिल्ह्यातल्या सर्व एमएस-सीआयटी केंद्रांच्या माध्यमातून हे शिबिर होईल, अशी माहिती ‘एमकेसीएल’चे प्रणय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील नामवंत विषयतज्ज्ञ तसेच पहिल्याच प्रयत्नात आयआरएस होणाऱ्या अत्यंत हुशार आणि कार्यतत्पर अशा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेली पंधरा वर्षे शासकीय सेवेमध्ये प्रभावीपणे काम करणारे डॉ. जयकृष्ण फड यांचेही मार्गदर्शन होणार आहे. डॉ. फड हे एमएससी अॅग्री असून, त्यांनी पीएचडी अॅग्रीकल्चर इकॉनॉमिक्समध्ये केली आहे. श्री. जयंत मणेरकर आयआयटी मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून एमटेक झाले असून, त्यांना भारत, अमेरिका, युरोपमधील आयटी क्षेत्रात २७ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. वैशाली मणेरकर यांनी मुंबई येथून बीई झाल्यानंतर आयटी क्षेत्रात २२ वर्षे काम केले आहे. हे दोन्ही उभयता विद्यार्थ्यांना ‘दहावी-बारावीनंतर काय?’ या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
एमकेसीएलचे रिजनल मॅनेजर श्री. तुषार निकम ‘प्रत्यक्ष कार्यानुभवातून पदवी कशी मिळवावी?’ यासंदर्भात मार्गदर्शन करतील. एमकेसीएलच्या माध्यमातून एमएससीआयटी बरोबरच एकविसाव्या शतकामध्ये आवश्यक अत्याधुनिक डिजिटल स्कीलच्या संदर्भात एमकेसीएलचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. तेली मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचे माजी सल्लागार गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना शाळेचे अथवा कॉलेजचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. विद्यार्थी, पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71373 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top