देवरूख ः उद्या शिवसेनेची निषेध रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः उद्या शिवसेनेची निषेध रॅली
देवरूख ः उद्या शिवसेनेची निषेध रॅली

देवरूख ः उद्या शिवसेनेची निषेध रॅली

sakal_logo
By

देवरूखात आज शिवसेनेची निषेध रॅली

साडवलीतील बनेंच्या निवासस्थानी मेळावाही
देवरूख, ता. २५ ः संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्यावतीने बंडखोरांचे निषेध करून तालुक्यातील शिवसेना पक्षसंघटना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे समर्थपणे उभी आहे, हे दाखवण्यासाठी उद्या (रविवारी ) सकाळी १० वा. माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या रत्नसिंधू साडवली येथील निवासस्थानी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे.
राज्यात सेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली असून, राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी मुंबईत गेले दोन दिवस राज्यातील नेते व पदाधिकारी यांच्या समवेत बैठकांचे आयोजन सुरू करत पक्षावर आलेल्या संकटावर मात करत बंडखोरी मोडीत काढून पुन्हा नव्याने भरारी घेणेसाठी मेळावे आयोजित करा, असा संदेश युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हा व तालुकाप्रमुखांच्या बैठकीत दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्यावतीने बंडखोरांचे निषेध करून तालुक्यातील शिवसेना पक्षसंघटना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठी समर्थपणे उभी आहे, हे दाखवण्यासाठी उद्या सकाळी १० वा. माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या रत्नसिंधू साडवली येथील निवासस्थानी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. मेळाव्यात सेना नेते माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, युवा नेते रोहन बने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, युवा सेना तालुकाधिकारी मुन्ना थरवळ, महिला संघटक नेहा माने, वेदा फडके, स्मिता लाड यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
..
चौकट
बंडखोरांचा निषेध करण्यासाठी
मेळाव्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्ववर विश्वास व्यक्त करण्यासाठी व बंडखोरांचा निषेध करण्यासाठी साडवली-शिवाजी चौक-माणिक चौक ते मराठा भवन अशी निषेध रॅली काढण्यात येणार आहे. तालुक्यातील तमाम निष्ठावंत शिवसैनिकांसह महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी केले.
---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71381 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..