रत्नागिरी ः अखेर लेकरांना त्यांची आई भेटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः अखेर लेकरांना त्यांची आई  भेटली
रत्नागिरी ः अखेर लेकरांना त्यांची आई भेटली

रत्नागिरी ः अखेर लेकरांना त्यांची आई भेटली

sakal_logo
By

rat२५p१३.jpg
L31664
ः रत्नागिरी ः काही काळ ताटातूट झालेली माय लेकरं भेटली.
...
आई फलाटावर, मुले रेल्वेत, ताटातूट झालेल्यांची भेट घडलीच

टीसी कापसेंचे प्रसंगावधान; प्रवाशांच्या मदतीने मुलांची खायची-प्यायची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः दोन लहानग्याना दूध, बिस्किट्स आणण्यासाठी आई फलाटावर उतरली. दरम्यान, गाडीने चिपळूण सोडले आणि त्या मुलांची आई स्टेशनवरच राहिली. भांबावून गेलेली आई फलाटावर रडू लागली अन आई न येता गाडी सुटली, म्हणून मुले रडू लागली. टीसी के. के. कापसे यांच्या नजरेस ही मुले पडली आणि रेल्वे पोलिसांच्या साह्याने माय लेकरे एकमेकांना भेटली.
ही भेट घडवून आणण्यात कोकण रेल्वेचे कर्तव्यदक्ष टीसी के. के. कापसे आणि माणुसकी जपणारे चिपळूण-पनवेलच्या रेल्वे पोलिस यांचा सिंहाचा वाटा आहे..
ट्रेन नं. १६३३६ नागरकॉईल गांधीधामने संध्या. ६.१५ ला चिपळूण सोडले आणि गाडी पनवेलच्या दिशेने धावू लागली. गाडीचा नंतरचा थांबा पनवेल येथे होता. त्यामुळे गाडी भरधाव निघाली होती. त्या गाडीला रत्नागिरी ते पनवेल अशी ड्युटी के. के. कापसे कोकण रेल्वेचे TTE पनवेल (मूळ गाव रोहा) हे करत होते. रेग्युलर चेकिंगदरम्यान त्यांना दोन लहान मुले गाडीत रडताना आढळली. चिपळूण येथे गाडी थांबली तेव्हा, त्यांना दूध, बिस्किट्स खाण्यासाठी आणावी म्हणून त्या लहानग्या मुलांची आई गाडीमधून उतरून फलाटावर असलेल्या स्टॉलवर गेली; परंतु, त्या दरम्यान गाडीने चिपळूण सोडले आणि त्या मुलांची आई स्टेशनवरच राहिली. अशावेळी काय करावे, हे ध्यानात आले नाही. ती फारच भांबावून गेली होती. फलाटावर ती रडत होती आणि गाडीत तिची दोन लहान मुलं.
कापसे यांना झालेला प्रकार लक्षात येताच त्यांनी कंट्रोल बेलापूर यांच्याशी संपर्क साधून चिपळूण स्टेशनमास्टर कार्यालयात कल्पना दिली आणि त्या मुलांना धीर देऊन पॅन्ट्री कार नसलेल्या गाडीत स्वतः आणि प्रवाशांच्या मदतीने त्या मुलांची खायची-प्यायची व्यवस्था केली. मुख्य म्हणजे मुलांना धीर देऊन त्यांची आई मागच्या ट्रेनने येत आहे आणि पुढल्या स्टेशनवर तुम्हाला ती भेटेल, असं सांगून शांत केले.
..
चौकट
काही तासाकरिता ताटातूट..
दरम्यान, चिपळूण स्टेशनमास्टर यांनी त्या आईला १२०५२ जनशताब्दी या गाडीत बसवून देऊन तसा मेसेज कापसे यांना दिला. कापसे यांनी पनवेल आरपीएफला मेसेज देऊन त्या बालकांना त्यांच्या स्वाधीन केले. पाठोपाठ जनशताब्दी ट्रेनने आलेल्या त्या मुलांच्या आईच्या ताब्यात ती दोन्ही बालकं स्वाधीन केली आणि काही तासाकरिता ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71387 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top