राजापूर ः तीनही हरकती फेटाळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः तीनही हरकती फेटाळल्या
राजापूर ः तीनही हरकती फेटाळल्या

राजापूर ः तीनही हरकती फेटाळल्या

sakal_logo
By

rat25p20.jpg
L31706
ःराजापूर तालुका पंचायत समिती

प्रभाग रचनेवरील हरकती फेटाळल्या

राजापूर तालुका; प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब

राजापूर, ता. २५ ः तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर वडदहसोळ, देवाचे गोठणे आणि सागवे अशा तीन ठिकाणांहून दाखल झालेल्या विविध प्रकारच्या हरकती फेटाळण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर आता अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यातून, सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण नव्याने अस्तित्वात येणार आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेच्या निर्धारित कालावधीमध्ये वडदहसोळ येथील लोकांनी आपली हरकत दाखल केली होती. वडदहसोळ गावाचा यापूर्वी ओणी गट आणि गणामध्ये समावेश होता. मात्र, नव्या प्रभाग रचनेनुसार वडदहसोळवासीयांचा कशेळी जिल्हा परिषद गट आणि पेंडखळे पंचायत समिती गणामध्ये समावेश केलेला आहे. हा केलेला बदल अयोग्य असल्याची हरकत वडदहसोळ येथील ग्रामस्थांनी नोंदवली होती. तर, देवाचे गोठणे येथील संजय नाटेकर यांनी सोलगाव पंचायत समिती या नव्या गणाबद्दल हरकत नोंदवली. देवाचेगोठणे गावची लोकसंख्या चार हजारांहून अधिक असून, नवीन पंचायत समितीचा गण असलेल्या सोलगावची लोकसंख्या तीन हजारच्या आसपास आहे. त्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या देवाचे गोठणेला पुन्हा पंचायत समिती गण म्हणून जाहीर करावे, अशी मागणी नाटेकर यांनी हरकतीद्वारे केली. यावेळी त्यांनी यापूर्वी देवाचे गोठणे या नावाने पूर्वीचा पंचायत समिती गण असल्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले.
कातळी जिल्हा परिषद गटाबाबत संभाजी मसूरकर यांनी हरकत नोंदवली आहे. सागवे ही नऊ महसुली गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून कातळी हा छोटा लोकसंख्या असलेला गाव आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीचा गण सागवे म्हणून पुन्हा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी या हरकतीद्वारे केली. यापूर्वीचा गट हा सागवे जिल्हा परिषद गट म्हणून होता. त्या तीनही हरकती फेटाळण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप आता मिळणार आहे.
..
चौकट ः
दृष्टिक्षेपात राजापूर
गट *गण
ताम्हाणे *ताम्हाणे आणि वाटूळ
तळवडे *तळवडे आणि पाचल
केळवली *केळवली आणि कोदवली
कशेळी *कशेळी आणि पेंडखळे
साखरीनाटे *साखरीनाटे आणि सोलगाव
कातळी *कातळी आणि अणसुरे
जुवाठी *जुवाठी आणि तारळ गण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71401 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top