सीएनजी टेम्पो अचानक पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजी टेम्पो अचानक पेटला
सीएनजी टेम्पो अचानक पेटला

सीएनजी टेम्पो अचानक पेटला

sakal_logo
By

31634
सिंधुदुर्गनगरी ः आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला टेम्पो.


सीएनजी टेम्पो अचानक पेटला

सिंधुदुर्गनगरीतील घटना; नागरिकांच्या प्रसंगावधानाने आग आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः ओरोस-ब्राह्मणवाडी येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास सुपर कॅरी सीएनजी टेम्पोला अचानक आग लागल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. टेम्पोला लागलेली आग घरातील विद्युत वायरपर्यंत पोहोचल्याने मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र नागरिकांनी मिळेल तिथले पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
ओरोस-ब्राह्मणवाडी महिंद्र परब यांच्या घराला लागून सुपर कॅरी टेम्पो उभा केला होता. हा टेम्पो सीएनजी होता. रात्री दोनच्या सुमारास या टेम्पोने अचानक पेट घेतला. मोठा आवाज आल्याने परब यांच्या आईने खिडकी उघडून बाहेर पाहिले असता ही घटना निदर्शनास आली. या आगीने घराच्या विद्युत वाहिन्याही पेटू लागल्या होत्या. परब यांच्या आईने अग्निशमक दल कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क झाला नाही.
आरडाओरड केल्यानंतर नजीकच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळ पाणी नव्हते. ग्रामस्थांनी मिळेल तिथून पाणी उपलब्ध करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे वाहन चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नंदू गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल योगेश्वर मुंढे यांचा यात समावेश होता.
---
कामगारांनी केली मदत
ग्रामस्थ, पोलिस व तेथील राजस्थानी कामगार मंगलाराम देवासी, हिंगुराम देवासी, भरलाल देवासी यांनी आग आटोक्यात आणली. आगीचा भडका मोठा असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71410 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top