राजापूर ः राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस
राजापूर ः राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस

राजापूर ः राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस

sakal_logo
By

राजापूर तालुक्यात दमदार
पावसाने नद्या प्रवाहित

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः हवामानखात्याने मान्सूनबाबत हाय अलर्ट दिलेला असताना काल (ता. २४) रात्रीपासून पावसाची रीपरीप सुरू झाली. तालुक्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. यामध्ये कुठेही नुकसान झालेले नसले तरी दिवसभरातील सातत्यपूर्ण पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या मशागतींच्या कामांना आज दिवसभर ब्रेक लागला होता. दरम्यान, सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी कोरड्या ठणठणीत झालेल्या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पात्रांमध्ये पाणी वाहून नद्या उन्हाळ्यानंतर पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याचे चित्र दिसत होते.
दमदार सुरवातीनंतर पावसाने गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली होती; काल सायंकाळपासून पावसाची तालुक्यामध्ये रिपरीप रात्रभर सुरू होती. त्यानंतर सकाळचे काही मोजके तास विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. दिवसभर सातत्याने मुसळधार पाऊस पडत होता. पावसाने तालुक्यात कोणतीही दुर्घटना वा नुकसान झालेले नसल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
..
चौकट
उखळणी, बेरणीची कामे अंतिम टप्प्यामध्ये
गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली असल्याने शेतकऱ्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे हाती घेतली होती. शेतांमध्ये उखळणीच्या कामांनी वेग घेतला होता. उखळणी आणि बेरणीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असताना आज दिवसभर झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना आज दिवसभर काहीसा ब्रेक लागला होता.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71422 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..