खेड ः खेडमधील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्यासोबतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः खेडमधील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्यासोबतच
खेड ः खेडमधील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्यासोबतच

खेड ः खेडमधील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्यासोबतच

sakal_logo
By

खेड शिवसेना आमदार योगेश यांच्या पाठीशी

सर्व पदाधिकाऱ्‍यांचा पाठिंबा; रामदास कदमांचीही पाठराखण

खेड, ता. २५ ः शिवसेनेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या गटामध्ये सामील झालेल्या खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प शनिवारी खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीरपणे केला. या वेळी जिल्ह्यात पक्षाने आयात केलेल्या नेत्यांनी विरोधकांना जवळ करून स्थानिक आमदार योगेश कदम यांना डावलले असा आरोप शिवसैनिकांनी केला.
भरणे येथील हॉटेल बिसू हॉटेल या ठिकाणी शनिवारी तालुक्यातील शिवसैनिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत ऊर्फ अण्णा कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव, तालुका सचिव सचिन धाडवे, शहरप्रमुख निकेतन पाटणे, महिला आघाडीच्या माधवी बुटाला, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया पवार, संजना कुडाळकर, रसिका खेडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एकमताने आमदार योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निश्चय करण्यात आला. आमदार कदम हे सध्या गुवाहाटी येथे असून, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांच्या गटामध्ये सहभागी झाले आहेत. असे असले तरी आमदार योगेश कदम यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करत आपण काल, आज आणि उद्याही शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट करत दापोली मतदारसंघात परतताना भगवा घेऊनच येईन, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम हे भगव्यासोबत कधीही प्रतारणा करणार नाहीत, असा विश्वास या वेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. खेड तालुका शिवसेना, शहर शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे सर्व शिवसैनिक हे शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. या वेळी खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिवसैनिक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------------------
चौकट
परब यांचे नाव न घेता टीका
राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला दापोली मतदारसंघ आमदार योगेश कदम यांनी परत काबीज केला; पण जिल्ह्यात आयात नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नावाखाली विरोधकांना हाताशी धरून शिवसेनेच्या आमदारांना डावलण्याचे काम केले, अशी टीका पालकमंत्री अनिल परब यांचे नाव न घेता या वेळी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत शिवसैनिकांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही त्याची दखल मातोश्रीवर घेतली गेली नाही याकडे लक्ष वेधले. शिवसेना वाढवण्यामध्ये रामदास कदम यांचे योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71432 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..