खेड ः तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग
खेड ः तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

खेड ः तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

sakal_logo
By

फोटो rat25p23.jpg
31752
ः खेड ः महामार्गावरील भरणेनाका येथील पुलाखालून खेडहून आंबवलीकडे जाणारा कच्चा रस्ता खचला होता. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करताना ठेकेदार.
.......
फोटो rat25p24.jpg
L31753
ः मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यातून माग काढताना वाहनचालक. (सिद्धेश परशेट्ये ःसकाळ छायाचित्रसेवा)..
....
खेड तालुक्यात जोरदार पाऊस

शहरात शुकशुकाट; महामार्गावर खड्ड्यांचा त्रास
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ ः गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने खेड तालुक्यात हजेरी लावली आहे. पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार बॅटिंग सुरू केली. आहे. संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला असून, सुकलेल्या भातरोपांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात कुठेही पडझड झालेली नाही. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे नारंगी व जगबुडी नदीपात्रात पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाने दमदार सुरवात करताच खेड बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यात शेतीच्या कामांना वेग आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्‍यांनी नांगरणी करायला सुरवात केली आहे. पावसामुळे खेड शहर परिसरासह ग्रामीण भागात अनेकवेळा विद्युतपुरवठा खंडित होत होता तर महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यातून माग काढताना वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. मध्यरात्री दमदार सुरवात केलेल्या पावसामुळे शेतकरीवर्गासह खेडवासियांनी समाधान व्यक्त केले.
...
चौकट
आंबवलीकडील कच्चा रस्ता खचला
महामार्गावरील पुलाखालून खेडहून आंबवलीकडे जाणारा कच्चा रस्ता सकाळी खचला. त्यामुळे अनेक गाड्या त्या चिखलात फसल्या होत्या. महामार्गावरील भरणे नाक्यावर पावसामुळे चिखलातून वाहने चालवणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी महामार्ग कंपनीच्या ठेकेदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71442 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..